पण मोबाइल बिघडला; संपर्क होत नव्हता अखेर…
पंजाब सरकारच्या दिवाळी बंपर लॉटरीमध्ये एका व्यक्तीला 11 कोटीची लॉटरी लागलेली. त्या व्यक्तीचा शोध लागला आहे. या व्यक्तीच नाव अमित आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये तो बटाटे-टोमॅटोचा स्टॉल लावतो.
मंगळवारी अमित, पत्नी आणि दोन मुलांसह चंदीगड येथील पंजाब स्टेट लॉटरीजच्या ऑफिसमध्ये लॉटरी क्लेम करण्यासाठी पोहोचला. सरकार त्याला 11 चेक सोपवणार आहे.
अमितने सांगितलं की, “मी गल्लीत बटाटे-टॉमेटो विक्रीचा स्टॉल लावून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मला लॉटरी लागलीय यावर मला विश्वास बसत नाहीय. कधी स्टॉल लावताना पोलिसांचे अपशब्द ऐकावे लागायचे” “मी हनुमान देवाचे आभार मानतो. त्यांची कृपा माझ्यावर झाली. मी 20 वर्षापासून तिकीट विकत घेतोय” असं अमित म्हणाला.
या पैशांच काय करणार?
“इथे येण्यासाठी माझ्याकडे तिकीटाचे सुद्धा पैसे नव्हते. मी कोणाकडून उधार घेतले. आता माझं नशीब पूर्णपणे बदललय. माझा मुलगा बोलायचा, पप्पा मी आयएएस ऑफिसर बनणार. आता मी माझ्या मुलांना चांगलं शिक्षण देईन” असं अमित त्याच्या भविष्याबद्दल बोलून गेला.
किती लाख तिकीटं विकली गेलेली?
पंजाब स्टेट डियर दिवाली बंपर 2025 लॉटरीत एकूण 36 कोटी 14 लाख 78 हजार रुपयांच्या बक्षिसांच वाटप करण्यात आलं. या लॉटरीची जवळपास 18 लाख 84 हजार तिकीटं विकली गेली होती. लुधियाना, पतियाळा आणि जालंधरमध्ये सुद्धा लोकांना छोटी-मोठी बक्षीसं लागली. अमितने भतिंडा येथे (नंबर A 438586) तिकीटाची लॉटरी विकत घेतलेली.
अमित जयपूरला निघून गेला
भतिंडा येथे लॉटरीची तिकीट विकत घेताना अमितने त्याचा मोबाइल नंबर दिलेला. त्यानंतर अमित जयपूरला निघून गेला. त्याचा मोबाइल खराब झाला. लॉटरी निघाल्यानंतर त्याच्या नंबरवर संपर्क करण्यात आला. पण नंबर सतत बंद येत होता.
30 दिवसात करावा लागतो क्लेम
या वर्षी 200000 से 999999 नंबर्सच्या तीन सीरीजमध्ये (A, B आणि C) एकूण 24 लाख लॉटरी तिकीट छापण्यात आलेले. जर, तुम्हाला इनाम मिळालं असेल, तर 30 दिवसांच्या आत पंजाब स्टेट लॉटरीजच्या कार्यालयात तिकीट जमा करावं लागेल. 30 दिवसांच्या आत बक्षीसासाठी अर्ज केला नाही, तर इनाम मिळणार नाही. इनाम देताना सरकार टॅक्स कापून देणार.


