ड्रेसिंग रूममधील धम्माल व्हिडीओ व्हायरल !
रोहित शर्माचा एक धमाल व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित ड्रेसिंग रूममध्ये इतर खेळाडूंसोबत प्रँक करताना दिसतो. तो त्यांना शॉक देणारा पेन देतो आणि मग त्यांची मजा घेतो.
हा व्हिडिओ पाहून खरंच हसू आवरणं कठीण आहे.
रोहित शर्मा सध्या मुंबईत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी जोरदार तयारी करत आहे. रोहितच्या बॅटिंगचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर रोहितचा एक धमाल व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तो शॉक देणाऱ्या पेनचा वापर करून इतरांवर प्रँक करताना दिसतो. हा व्हिडिओ पाहून खरंच तुम्हालाही हसू आवरणार नाही.
(फोटो सौजन्य – rohitsharma45/instagram)
रोहितनं कसा केला प्रँक?

रोहितचा हा व्हिडिओ आतापर्यंत ४ कोटी ३६ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. नेटकऱ्यांनीही या प्रँकवर हसून दाद दिली आहे. असो, रोहित शर्मा येत्या ३० नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत रोहितनं धमाकेदार फलंदाजी करत शतक झळकावलं होतं. त्यामुळे हा फॉर्म तो आफ्रिकेविरुद्ध देखील कायम ठेवेल, अशी अपेक्षा चाहत्यांनी व्यक्त केली आहे. कारण निवड समिती त्याला २०२७ पर्यंत खेळवण्यास फारशी इच्छूक नसल्याचं सध्याचं चित्र आहे. त्यामुळे वर्ल्ड कप २०२७ पूर्वी खेळल्या जाणाऱ्या प्रत्येक सामन्यात रोहितनं चांगलं प्रदर्शन करणं गरजेचं आहे.