पुढे जे घडलं ते पाहून हसू आवरणार नाही !
बिहार निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका नेत्याचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भाषण करताना मतांची भिक मागण्यासाठी शर्ट पुढे केल्यावर एका वृद्धाने त्यात १ रुपयाचं नाणं टाकलं.
हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्या नेत्याची फिरकी घेत आहेत.
बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला असून, आश्चर्य म्हणजे पहिल्या टप्प्यात जवळपास ६४.६६% इतकं विक्रमी मतदान झाल्याचं म्हटलं जात आहे. आता दुसऱ्या टप्प्यासाठी राजकीय नेते जोमाने प्रचार करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर एका राजकीय नेत्याचा एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे.
हा नेता स्टेजवर उभा राहून लोकांसमोर भाषण करत होता आणि मतांसाठी विनंती करत होता. त्याने प्रतीकात्मक पद्धतीने मतांची भिक मागण्यासाठी आपला शर्ट झोळीप्रमाणे पुढे केला. पण तेवढ्यात एका वृद्ध व्यक्तीनं तो भिक मागतोय असा गैरसमज करून आपल्या खिशातून १ रुपयाचं नाणं काढलं आणि त्याच्या झोळीत टाकलं. हे दृश्य पाहून सगळेच हसू लागले.
(फोटो सौजन्य – laughtercolours/Instagram)हा व्हिडीओ होतोय व्हायरल
हा प्रकार लक्षात येताच नेता संतापला आणि रागाने ते नाणं फेकून दिलं. ही घटना सभेत उपस्थित असलेल्या कोणीतरी व्यक्तीनं आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ laughtercolours या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. हिरव्या रंगाचा शर्ट घातलेला नेता स्टेजवर उभा राहून जोशात भाषण देत आहे. लोकं टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत आहेत. दरम्यान त्याने मतांसाठी विनंती करत शर्ट पुढे केला आणि “मला मतांची भिक द्या” असं प्रतिकात्मकपणे म्हटलं. त्याच क्षणी, स्टेजजवळ उभ्या असलेल्या वृद्धाने त्याच्या झोळीत नाणं टाकलं.
(फोटो सौजन्य – laughtercolours/Instagram)
नेटकरी घेताहेत नेत्याची फिरकी
ही घटना पाहून उपस्थित लोकांना प्रचंड हसू आलं, आणि आता नेटकरी या नेत्याची सोशल मीडियावर जोरदार फिरकी घेत आहेत. कुणीतरी मजेत कमेंट केली. ‘१० रुपयांची नोट दिली असती, तर कदाचित तो इतका रागावला नसता. दरम्यान, हा नेता कोण आहे किंवा ही सभा कुठे झाली याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.


