नितीश कुमार यांच्या जेडीयूचा वारू उधळला;एक्झिट पोलनुसार सर्वाधिक जागा मिळणार…
बिहार विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल समोर आले आहेत. यातील बहुतांशी टीव्ही चॅनेल आणि एजन्सींनी बिहारमध्ये एनडीएचे सरकार येण्याचा अंदाज वर्तवला आहे.
त्यामुळे महाआघाडीला मोठा धक्का बसला आहे. आता लोक 14 नोव्हेंबरला जाहीर होणाऱ्या निकांलांची प्रतिक्षा करत आहेत. एक्झिट पोलनंतर आता बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्नही उपस्थित होत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जेडीयूला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज
बिहार विधानसभेच्या निकालाबाबत मॅट्रिज-आयएएनएस आणि चाणक्य यांनी एक्झिट पोल सादर केले आहेत. मॅट्रिज-आयएएनएसने जेडीयूला 67 ते 75 आणि भाजपला ६५ ते ७३ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. चाणक्यच्या पोलमध्ये भाजपला 70 ते 75 आणि जेडीयूला 52 ते 57 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार?
मॅट्रिझ आएएनएस संस्थेच्या एक्झिट पोलनुसार बिहारचे विद्यामान मुख्यमंत्री नितीश कुमार याचा जेडीयू हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. त्यानंतर भाजपा हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. आरजेडी पक्ष तिसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे. या पक्षाला एकूण 53 ते 58 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.
जेडीयूचं पारडं जड
एनडीएला बहुमत मिळाल्यास जेडीयू आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच पहायला मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही भाजपला मुख्यमंत्री पदाची खुर्ची हवी आहे, यासाठी भाजपने कंबर कसली आहे. मात्र नितीश कुमार यांच्या पक्षाला जास्त जागा मिळण्याचा अंदाज असल्याने ते मुख्यमंत्री पदावर दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचे बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न भंगण्याची शक्यता आहे.
नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री
एनडीएचे सरकार आल्यास नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची शक्यता आहे. कारण अनेकदा ज्या पक्षाच्या जास्त जागा येतात त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो. त्यामुळे जर जेडीयूने जास्त जागा जिंकल्यास पुन्हा एकदा बिहारचे नेतृत्व नितीश कुमार यांच्याकडे जाऊ शकते. यामुळे बिहारमध्ये मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी भाजपला वाट पहावी लागण्याची शक्यता आहे.


