मोठ्याने नेत्याने सांगितली अंदर की बात !
आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत युती आघाडीमध्ये मोठे बदल पाहण्यास मिळत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काही ठिकाणी युती करताना दिसत आहेत. त्यातच काँग्रेसने देखील काही ठिकाणी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत काही ठिकाणी युती करण्याची तयारी दाखवली आहे.
राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे उमेदवार निश्चित करण्यासाठीची काँग्रेस पक्षाच्या राज्य निवडणूक मंडळाची महत्वाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीच्या आधीच काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवारयांनी सांगितले की, स्थानिक पातळीवर ‘वंचित’सोबत बोलणी सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी वंचितसोबत युती होताना दिसत आहे.
वडेट्टीवार यांनी वंचितसोबत युतीचे संकेत देण्यासोबत आणखी एका आंबेडकरवादी पक्षासोबत युती होणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, वंचितसोबतच स्थानिक पातळीवर बहुजन समाजवादी पार्टी (बसपा) बाबत देखील स्थानिक पातळीवर आघाडीचा निर्णय घेतला जात आहे.
आघाडीचा निर्णय दोन दिवसांत…
विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार फायनल केले जाणार आहेत. महाविकास आघाडीतील पक्षांशी काही ठिकाणी आघाडीबाबत बोलणी सुरू आहे. त्या ठिकाणी निर्णय आम्ही एक दोन दिवसांसाठी पेंडीग ठेऊ.
महायुतीसोबत जाणार नाहीच…
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र काही ठिकाणी लढण्याचा निर्णय घेत असताना महायुतीमधील पक्षाशी काँग्रेस स्थानिक पातळीवर युती करणार का? या प्रश्नाबाबत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, कुठलाही परिस्थितीमध्ये महायुतीमधील पक्षासोबत युती केली जाणार नाही. आम्ही स्वतंत्र लढू मात्र त्यांच्यासोबत युती करणार नाही.


