500 हून जास्त ठिकाणांवर छापेमारी…
जम्मू काश्मीर : देशाची राजधानी दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला.
गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या लाल किल्ला परिसरामध्ये हा हल्ला करण्यात आला. यामध्ये 9 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असून सर्वांनी रोष व्यक्त केला जात आहे. दिल्ली बॉम्बस्फोटामध्ये (Delhi bomb blast) जैश-ए-मोहम्मदच्या लोकांचा देखील समावेश असल्याचे दिसून आले आहे. यानंतर आता सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आली आहे. दिल्ली बॉम्बस्फोटनंतर काश्मीरमध्ये (Kashimir News) 500 हून अधिक जागांवर छापेमारी करण्यात आली. यामध्ये काही बाबी या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
दिल्लीच्या बॉम्बस्फोट हल्ल्यामध्ये दहशतवादी संघटनांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. यानंतर काश्मीरमधील 500 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. जम्मू काश्मीर पोलिसांनी 500 हून अधिक ठिकाणी रेड केली असून यामधून 600 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले. काश्मीरमधील ही कारवाई जमात-ए-इस्लामी या संघटनेविरोधात करण्यात आली. या संघटनेबाबत सुरक्षा एजन्सिला इनपुट मिळाले होते. या मिळालेल्या माहितीनुसार छापेमारी करण्यात आली. यामध्ये श्रीनगर, कुलवामा, पुलवामा, शोपिया आणि बारामुला या जिल्ह्यांसह काही इतर भागांचा समावेश आहे.
दरम्यान, डॉक्टर मॉड्यूलवरही कारवाई करण्यात आली आहे. तीन सरकारी कर्मचाऱ्यांसह सुमारे १० जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती जम्मू काश्मीरमधील अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, रात्रीच्या छाप्यांमध्ये तपासकर्त्यांनी अनंतनाग, पुलवामा आणि कुलगाम जिल्ह्यातील संशयितांना ताब्यात घेतले. सोमवारी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर, पोलिस आणि इतर सुरक्षा एजन्सींनी खोऱ्यातील दहशतवादी नेटवर्कविरुद्धच्या कारवाई तीव्र केल्या आहेत. लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात आतापर्यंत एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, संशयितांच्या चौकशीतून असे दिसून आले की त्यापैकी काही जण गेल्या वर्षभरात तुर्कीलाही गेले होते. स्फोटकांचा मोठा साठा जप्त केल्याप्रकरणी डॉक्टरांसह सात जणांना अटक करण्यात आली आहे, तर “व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल” शी संबंधित तपासकर्त्यांनी आतापर्यंत २०० हून अधिक लोकांची चौकशी केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला पोलिसांनी अटक केलेल्या दोन दहशतवादी कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हे मॉड्यूल उघडकीस आले. जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाममध्ये २०० आणि श्रीनगरमध्ये १५० ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.


