लोकल ट्रेनमध्ये धक्का लागल्याने झालेल्या वादातून मारहाण झाल्यानंतर तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार कल्याणमधून समोर आला होता. आहे. धक्का लागल्यानंतर टोळक्याने मराठी बोलण्यावरुन त्याला मारहाण केली.
मराठी-अमराठी वादावरुन झालेल्या मारहाणीनंतर तरुणाने नैराश्यातून गळफास घेत आत्महत्या केली. राहत्या घरात त्याने गळफास घेतला. अर्णव खैरे असं 19 वर्षीय तरुणाचं नाव आहे. दरम्यान भाजपने यावर ठाकरे बंधुंवर निशाणा साधला होता. यावर आता मनसेकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. मनसे नेते संदिप देशपांडे यांनी यावरुन भाजपवर टीका केलीय.
भाजपने काय केले होते आरोप?
मराठी माणसाने ठाकरे बंधूंना भरभरून प्रेम दिले. सत्ता दिली, सन्मान दिला. पण परत काय मिळाले….? असा प्रश्न भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विचारला? भकास मुंबई, आणि त्यांच्या स्वार्थी भावनिक राजकारणापायी निर्माण झालेला द्वेष दिसतोय. अर्णव खैरे या तरुणाच्या मृत्यूच्या पापातून ठाकरे बंधूंना सुटता येणार नाही, भाषिक द्वेषाचे जे कारखाने त्यांनी चालवले त्यातूनच हा मृत्यू घडला असल्याचे ते म्हणाले. ठाकरे म्हणजे मुंबई नाही, ठाकरे म्हणजे मराठी माणूस नाही, असे ते म्हणाले.
जी घटना घडली कोणीही आत्महत्या घडली ती क्लेशदायक आहे. मनसेच्या संवेदना त्या कुटुंबाप्रती आहे.अशा प्रकारे राजकारण करणं याचा निचापणा करण भाजपकडे असल्याचे संदिप देशपांडे म्हणाले. संवेदनहीन नीच प्रवृत्तीच कोण आले होते जे फोन वरून अधिकाऱ्यांना शिवीगाळ करतात.हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तेव्हा संवेदना व्यक्त करण्याचं सौजन्य दाखवलं नाही.लोकलमध्ये गर्दीतून खाली पडून मृत्यू पावले त्यांच्याप्रती संवेदना दाखवली नाही. ज्या साधूंची हत्या केली त्याला पक्षात प्रवेश दिला. त्यांचा दळभद्रीपणा आहे.जो भाजप हा अटलजी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन यांचा पक्ष होता, असे संदिप देशपांडे म्हणाले.
सत्य बाहेर आलं नाही, कोणाला पकडलं नाही, त्यांच्याकडून काही कळलं नाही.त्यावर आंदोलन करण्याची खाज अमित साटम यांना आली.आम्ही अटल बिहारी वाजपेयी यांना प्रार्थना करतो.गुजरात दंगली झाल्या तेव्हा त्यावेळी एकदिवसच प्रयशित्य मोदी यांनी केलं. कोणाच्या मृत्यू बद्दल भाजपने राजकारण करू नये, असे देशपांडे म्हणाले.
वडील सांगतात ते नाकारत नाही.कशामुळे वाद झाला.हे माहीत नाही.का एवढी घाई आहे का महापौर बसवायची? असा प्रश्न त्यांनी विचारला. इतके मृत्यू झाले त्यावेळी का नाही बोलले? असा प्रश्न त्यांनी विचारला.
महायुतीत महापौर निवडण्याची घाई
एवढ्या मोठ्या घटनेनंतर सत्य बाहेर आलेच नाही, कोणी आरोपी पकडलेही नाहीत, तरी महापौर बसवायची घाई का? जेव्हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात १४ लोक मेल्यावरही कोणी राजीनामा दिला नाही, तेव्हा भाजपला घाई नव्हती. बिहारमध्ये पूल कोसळला तेव्हा नितीश कुमारांना राजीनामा द्यावा असं वाटलं नव्हतं, असंही ते म्हणाले.
काँग्रेसची अवस्था
काँग्रेस अमिबासारखा पक्ष आहे – मेंदू कोणाकडे हे कळत नाही. वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, भाई जगताप, अस्लम शेख यांच्या वक्तव्यांना काही अर्थ नाही. ठोस प्रस्ताव आल्यावरच राज ठाकरे निर्णय घेतील, असे देशपांडे म्हणाले.
‘शरद पवारांनी थेट बोलावं’
मनसेला सोबत घ्यायचे असेल तर शरद पवारांनी स्वतः राज ठाकरे यांच्याशी थेट बोलावे. तिसऱ्या माणसामार्फत प्रस्ताव येणार नाहीत, असे देशपांडे म्हणाले.


