निवडणुकीपूर्वीच केली मोठी घोषणा; घडामोडींना वेग !
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, प्रचाराला वेग आला आहे, येत्या दोन डिसेंबर रोजी नगर पंचायत आणि नगर परिषदेसाठी मतदान होणार आहे. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी महापालिकांची निवडणूक डोळ्या समोर ठेवून भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे.
मात्र या इनकमिंगचा फटका हा महाविकास आघाडीला कमी आणि महायुतीलाच जास्त बसत आहे. शिवसेना शिंदे गटातील अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे, त्यामुळे शिवसेना शिंदे गटात सध्या नाराजीचं वातावरण आहे, अनेकदा शिवसेना शिंदे गटातील नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून ही नाराजी व्यक्त देखील होत आहे.
दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे निवडणुकीपूर्वीच शिवसेनेकडून 40 ठिकाणी जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्षाकडून दिग्गजांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आमदार-खासदार मैदानात उतरणार आहेत. निवडणुका होईपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश पक्षनेतृत्वाकडून संपर्क प्रमुखांना देण्यात आले आहेत. खासदार नरेश मस्के यांच्याकडे नवी मुंबई, ठाणे आणि पुण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजपामध्ये जोरदार इनकमिंग
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वारं वाहत आहे, नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. येत्या दोन डिसेंबरला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. दरम्यान नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीनंतर राज्यात लगेचच जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे, त्यानंतर महापालिका निवडणुकीची घोषणा होऊ शकते, या सर्व निवडणुका डोळ्या समोर ठेवून सध्या भाजपात सर्वच पक्षामधून जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र यावेळी याचा सर्वात जास्त फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला आहे. यावरून शिवसेना शिंदे गट नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.


