थेट सत्याग्रहाला बसण्याचा इशारा; तात्काळ पक्षप्रवेशाला स्थगिती !
राज्यभरात एकमेकांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी फोडण्यावरुन भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत तणाव निर्माण झालाय. असे असतानाच आता भाजपच्यागोटातूनअशाचएकापक्ष प्रवेशा संदर्भात बातमी समोर आली आहे . भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी भाजप मधील एका पक्ष प्रवेशावर नाराजी व्यक्त केल्याने भाजप पक्ष श्रेष्टीं ना हा पक्ष प्रवेश मागे घ्यावा लागलाय . रेती माफिया यांना पक्षात घेतल्यामुळे आशिष देशमुख यां नी वरिष्ठांवर नाराजी व्यक्त केली होती . काँग्रेस नेते सुनील केदार यांचे कार्यकर्ते नरेंद्र पिंपळे आणि अमित राय यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला.
त्यावरून आशिष देशमुख यांनी भाजप नेतृत्वात नाराजी व्यक्तकेलीहोती.
दरम्यान, याचमुद्द्यावरून आशिष देशमुख यांच्याकडून भाजप नेतृत्वाला आव्हान देण्यातआलंहोत. रेती माफिया यांना पक्षात घेतल्यामुळे आशिष देशमुख यांनी वरिष्ठांवर नाराजी व्यक्तकेलीहोती. सुनील केदार यांचे कार्यकर्ते नरेंद्र पिंपळे व अमित राय यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला, त्यावरून आशिष देशमुख यांची भाजप नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्तकेलीहोती. तर पक्ष प्रवेश मागे घेतला नाही तर सत्याग्रहाला बसण्याचा इशाराही आशिष देशमुख यांनी दिलाहोता. अशीमाहितीहीमहसूलमंत्रीचंद्रशेखरबावनकुळेयांनीदिलीहोती. त्यामुळेआताभाजपपक्षनेतृत्वानेहापक्षप्रवेशस्थगित केल्याचीमाहितीआहे.
पक्ष प्रवेशाची माहिती पालकमंत्री बावनकुळे व आमदार आशिष देशमुख यांना नव्हती
आशिष देशमुख यांच्या आक्रमक भूमिकेनंतर अमित राय व नरेंद्र पिंगळे यांना तात्काळ पक्ष प्रवेश रद्द करण्याचा भाजप पक्ष श्रेष्ठीने निर्णय घेतलाय. तर गैरसमजातून हे पक्षप्रवेश झाल्याचे भाजप नेतृत्वाने मान्य करत हा पक्ष प्रवेश रद्द करणार असल्याचा दुजोरा एबीपी माझाला दिलाय. तर नरेंद्र पिंगळे व अमित राय यांच्या पक्ष प्रवेशाची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदार आशिष देशमुख यांना नव्हती. हा निर्णय स्थानिक स्तरावर जिल्हा अध्यक्ष म्हणून मी घेतला होता, असे भाजपचे जिल्हा अध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी सांगितले.
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर नगर परिषदेच्या निवडणुकीला हिंसक गालबोट
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर नगरपरिषदेत काँग्रेस उमेदवाराचे काम का करत नाही, भाजप वाल्यांना साथ का देतो? या रागातून आरिफ नावाच्या एका व्यक्तीला काँग्रेसचे नागपुरातील स्थानिक नेते व मावळत्या महापालिकेतील काँग्रेस नगरसेवक हरीश ग्वालबंशी आणि त्यांच्या पाच ते सहा सहकार्याने बेदम मारहाण केल्याचा आरोप होत आहे.
गंभीर जखमी झालेल्या आरिफला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आरिफने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी हरीश ग्वालबंशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात अपहरण आणि मारहाण, असे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे काल रात्री अकरा वाजताच्या सुमारास कळमेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विसावा बारमध्ये आरिफ आणि हरिश ग्वालबंशी आणि त्यांच्यासोबतचे सहकारी समोरासमोर आले. तेव्हा ग्वालबंशी यांनी आरिफला तू कळमेश्वर नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा काम का करत नाही, भाजप उमेदवाराला का साथ देतो अशी विचारणा केली.
भाजप उमेदवाराला का साथ देतो? जाबविचारात मारहाण
बेदमयावरून दोघांमध्ये वाद वाढला. ग्वालबंशी सोबतच्या सहकाऱ्यांनी आरिफचे अपहरण केले आणि त्यानंतर नागपूर जवळच्या गोरेवाडा परिसरात आणून मारहाण केली. नंतर जखमी अवस्थेतील आरिफला तिथेच सोडून आरोपी पळून गेले. जखमी आरिफला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हरीश ग्वालबंशी आणि त्याच्या चार सहकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक झाली आहे. मात्र काँग्रेस नेते हरीश ग्वालबंशी अजूनही फरार आहेत.


