आता चव्हाणांनी मौन सोडत उडवून दिली खळबळ; म्हणाले…
राज्यात सध्या नगरपंचायती आणि नगरपारिषदा यांच्या निवडणुकीचा रंग उधला जात आहे. प्रत्यक्ष मतदानाला फक्त आठवडाच शिल्ल्क असताना आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान तळकोकणात महायुती तुटल्यावरून शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार आरोप होताना दिसत आहेत. नुकताच यावरून उद्योग मंत्री उदय सामंत आणि आमदार नीलेश राणे यांनी यासाठी भाजपला जबाबदार धरले होते. ज्यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उत्तर दिले असून सारवासारवही करताना दिसले आहेत.
राज्यात एकीकडे महायुती एकसंघ असून काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होताना दिसत आहे. तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशाच पद्धतीने महायुतीतीत ही लढत्या होणार आहेत. यातच येथे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली असून शिवसेना-भाजपमध्ये वाद टोकाला गेला आहे.
या वादामुळे एकीकडे राणे बंधुंमध्ये संघर्ष निर्माण झाला असतानाच दुसरीकडे जिल्ह्यात महायुती तुटण्यामागे पालकमंत्रीच जबाबदार असल्याचे शिवसेना नेते राजन तेली यांनी आरोप केला होता. तर आमदार नीलेश राणे यांनी देखील युती तुटण्याचे खापर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर फोडले होते. तसेच सहसंपर्क मंत्री उदय सामंत यांनी देखील येथे युती तुटण्यास भाजपच कारणीभूत असल्याचे म्हटल्याने खुलेआम याची चर्चा सुरू होती.
दरम्यान आता या आरोपांवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मौन सोडले असून मोजक्याच शब्दात उत्तर दिले आहे. पण यावेळी त्यांनी कोड्यात उत्तर देत अंग काढले आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात नेमकं काय शिजतयं असा सवाल येथे केला जातोय.
चव्हाण यांनी, आमदार नीलेश राणे व उदय सामंत यांच्या युती तुटल्याच्या आरोपांना उत्तर देताना, पहिल्यांदा उत्तर देण्याच टाळलं आहे. त्यांनी, हा प्रश्न तुम्ही ट्विस्ट करून विचारत आहात. हा प्रश्नच स्पॉन्सर असल्याचे दिसत आहे. मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवून देतो म्हणजे सगळं स्पष्ट होईल.
आमदार नीलेश राणे असो किंवा उदय सामंत यांनी नेमक काय विचारलं आणि तुम्ही आता ट्विस्ट करून जे काय विचारत आहात त्या समोर येतील. तो व्हिडिओ एकदा पाहिलात तर बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात येतील. त्यामुळे आता चव्हाण हे नेमकं कोणत्या व्हिडिओबद्दल बोलत आहेत. त्यात नेमक काय आहे. आणि ते तो का पाहा असे म्हणत आहेत. असेच सवाल आता येथे उपस्थित केले जात आहेत.


