वाढवणा बु. प्रतिनिधी/संतोष कांबळे.
उदगीर तालुक्यातील समर्थ एज्युकेशन सोसायटी डोंगर शेळकीद्वारा संचलित सत्यशोधक पर्यावरण विकास विद्यालय हकनकवाडी या ठिकाणी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन व निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी उपस्थित समर्थ एज्युकेशन सोसायटी डोंगरशेळकीचे सचिव मा.श्री. प्रमोद व्यंकटेशजी चौधरी साहेब, संस्था सदस्य तथा समर्थ माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री सिद्धार्थ बोडके, संस्था सदस्य प्राध्यापक एम व्ही स्वामी सर, सत्यशोधक पर्यावरण विकास विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक निलेश जाधव सर, मुख्याध्यापक पाटील सी.वाय, जाधव बी पी, मुंडकर ए .एस, कांबळे एस. डी, मुंडे एन. डी, पवार आर. डी, सेवक अशोक राठोड, एक दिवशीय मुख्याध्यापिका कु. मानकरी दुर्गा शंकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक स्वर्गवासी व्यंकटेशजी चौधरी साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या एक दिवशीय स्वयंशासन दिनानिमित्त इयत्ता दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी एक दिवशीय शिक्षक होण्याचा अनुभव घेतला. प्रभारी मुख्याध्यापक निलेश जाधव सर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली प्रस्तावनेमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा बद्दल माहिती सांगितली आणि पुढे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन संस्थेचे सचिव तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रमोद चौधरी साहेब म्हणाले, विद्यार्थ्यांनी परीक्षेला न घाबरता सामोरे जावे परीक्षा देत असताना व्यवस्थित पेपर सोडवावा व्यवस्थितपणे अभ्यास करून परीक्षेला सामोरे जावा असे अनमोल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणानंतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट चे वाटप करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कांबळे एस. डी, व कु. सुरनर सुषमा मनोहर यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. सुरनर निकिता बाजीराव यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी इयत्ता दहावीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतला.
विद्यार्थ्यासमवेत संस्थेचे सचिव प्रमोद चौधरी साहेब, संस्था सदस्य श्री सिद्धार्थ बोडके सर, प्रभारी मुख्याध्यापक निलेश जाधव सर, श्री पाटील सी वाय, श्री मुंडकर ए एस, कांबळे एस डी, मुंडे एन डी, पवार आर डी, मठवाले सर ,अशोक राठोड, बालाजी जाधव आणि एकदिवसीय मुख्याध्यापक मानकरी दुर्गा व उपमुख्याध्यापक पवार प्रीती आणि सर्व विद्यार्थी
