दै.चालु वार्ता उस्माननगर (प्रतिनिधी )-लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर:-कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील सम्राट अशोक प्राथमिक शाळेत वार्षिक बाल आनंद (आनंदनगरी ) मेळावा पार पडला . विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणे तसेच त्यांच्यातील व्यावसायिक कौशल्य विकसित करणे तसेच गणितातील व्यवहारातील प्रत्यक्ष ओळख करून देणे या उद्देशाने दि.१६ फेब्रुवारी रोज सोमवारी आनंदनगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.शालेय वयापासूनच विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारी ज्ञानाचे आवड निर्माण व्हावी, या हेतूने कमवा आणि शिका हे ब्रीदवाक्य समोर ठेवून हा उपक्रम राबविण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष बाजारपेठ अनुभवली शाळेच्या विद्यार्थ्यांनी आनंद नगरीमध्ये विविध खाद्यपदार्थ आणि वस्तूचे अनेक स्टॉल लावले होते. घरून तयार केलेल्या खाद्यपदार्थ मुलांनी दिवसभरात विक्री केली. या स्टॉलच्या माध्यमातून तब्बल हजारो रुपयांचे संकलन केले. विशेष म्हणजे व्यवहाराची शिस्त
लागावी म्हणून प्रत्येक स्टॉल धारकाकडून त्याच्या खाद्यपदार्था प्रमाणे किंमत ठरवून खाद्यपदार्थ विकत होते. या संकलित निधीतून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.
आनंदनगरी मेळाव्याचे उद्घाटन उस्माननगर केंद्राचे केंद्रप्रमुख गादेकर सर यांनी केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष देवराव मल्हारराव सोनसळे , मुख्याध्यापक राहुल सोनसळे ,मरगिलवार सर,पत्रकार माणिक भिसे ,पत्रकार लक्ष्मण कांबळे व पालक ,शिक्षक ,विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की,पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न रहाता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जिवनातील व्यवहारांचे धडे शाळेतूनच दिले जातात असे म्हणाले,यानंतर
सर्व उपस्थित मान्यवरांनी आनंद बाजारातील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला. विविध पदार्थांच्या स्वादाने हा आनंद बाजार फूलून आला होता. प्रत्येक दुकानदार विद्यार्थी आपल्या मालाबद्दल खात्री देत होता. ग्राहक आकर्षित करण्याची शक्यता म्हणून मोठ्याने ओढून
सांगत होता. पहिली पासून ते आठवीपर्यंच्या अनेक विद्यार्थ्यांनी आपली वैयक्तिक व्यवसायिक दुकाने थाटली होती. यामध्ये भेळ,पापड,खिचडी , डबलमिठ्ठा , वडापाव, मुरमुरा चिवडा ,आलू चिप्स, समोसा , भजे , शिरखुमा, टरबूज ,चन्ने , ब्रेडपकोडा असे अनेक पदार्थांचे दुकाने थाटली होती . या स्वादिष्ट, रुचकर पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व आपल्या पाल्यांचे विक्री कौशल्य पहाण्यासाठी पालकांची गर्दी झाली होती . पालका समवेत अनेकांनी आनंदनगरीचा आस्वाद घेतला.
या मेळाव्याचे पालक, शिक्षक यांनी कौतुक केले. हा आनंदनगरीचा मेळावा यशस्वी पार पाडण्यासाठी देविदास डांगे ,भगवान राक्षसमारे ,मन्मथ केशे , सिद्धोधन लाठकर, सौ.प्रियदर्शिनी चेनपुरकर ( सोनसळे ),मनिषा भालेराव ( सोनसळे ), सौ.रोहीनी सोनकांबळे , सौ.नगमा मॅडम,शकील शेख या शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेऊन आनंद नगरी मेळावा यशस्वी पार पाडला.
