पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, पेहरावानं वेधलं लक्ष…
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता सुनेत्रा पवार पक्षाची धुरा संभाळत आहेत. दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून पार्थ पवार राज्यसभेत येणार का?
अशा बातम्या समोर येत होत्या. अखेर आज पार्थ पवार यांच्या राज्यसभेच्या खासदारकीचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी अजित पवार जसा जॅकेट परिधान करायचे अगदी तसाच जॅकेट परिधान केला आहे. अगदी तोच आवाज आणि त्याच जॅकेटने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
दिल्लीत पार पडला राज्यसभेच्या खासदारकीचा शपथविधी
दरम्यान, पार्थ पवार यांचा राज्यसभेच्या खासदारकीचा शपथविधी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितित पार पडला. पार्थ पवार यांना अजित पवार यांच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन तरुण युवा नेते म्हणून पाहिले जाते. शपथविधीच्या सोहळ्यानंतर पार्थ पवार सुनेत्रा पवार सुनील तटकरेंच्या निवासस्थानी दाखल झाले. जिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
पार्थ पवार यांचा राजकीय प्रवास
पार्थ पवार यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत बोलायचे झाले तर, त्यांचा राजकीय प्रवास 2019 पासून सुरू झाला. त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तरीही त्या निवडणुकीमुळे ते राज्यभार चर्चेत आले आणि तरुण नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. बारामतीली विमान दुर्घटनेत अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाल्यानंतर पक्ष आणि पवार कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली, पण खचून न जाता सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सर्व सूत्र हातात घेतली आणि आता पार्थ पवारा यांनीही राज्यसभेत खासदार म्हणून त्यांचे स्थान मिळवले आहे.
अजित पवारांसारखा जॅकेट; मात्र, त्यांच्यासारखे काम जमेल का?
पवार कुटुंबाचा महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळ प्रभाव राहिला आहे. या पार्श्वभूमीचा फायदा पार्थ पवार यांना नक्कीच मिळू शकतो. यामुळे राजकारणात प्रवेश करणे आणि जनतेपर्यंत पोहोचणे तुलनेने सोपे असले तरी आणि पार्थ पवार यांनी अजित पवारांसारखा जॅकेट परिधान केला असाल तरी, त्यांच्या सारखे काम करणे, जनतेचे प्रश्न चुटकीसरशी सोडवणे, राजकारणातील खेळी ओळखणे आणि नेतृत्व दीर्घकालीन टिकवणे या सगळ्या गोष्टी पार्थ पवार यांनाही जमतील का? असा सवाल अनेक राजकारणांकडून उपस्थित केला जात आहे. यासाठी त्यांना त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण करणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे.
