किनवट-शुभम शिंदे
छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय शस्त्रांग मार्शल आर्ट स्पर्धेत रामनगर येथील श्रीवेद सुनील बोलेनवार याने उल्लेखनीय कामगिरी करत कांस्पदक पटकावले. स्पर्धेदरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
या यशाबद्दल त्याला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक तसेच सहकार्य करणाऱ्या खेळाडू व कुटुंबीयांचे अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्याच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून पुढील स्पर्धांसाठी त्याला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
