दैनिक चालु जिल्हा प्रतिनिधी – किशोर फड .
बीड/अंबाजोगाई
वार्षिक कलामहोत्सवात विद्यार्थ्यांनी केले नृत्य,कला आणि अभिनयाचे बहारदार सादरीकरण..
———————————
अंबाजोगाई येथील जिजाऊ विद्यालय येथे वार्षिक कला महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष राजकिशोरजी मोदी तर उद्घाटक म्हणून विजय रापतवार, तर प्रमुख पाहुणे म्हणून पी.एस.आय रवीकुमार पवार, अरुंधती पाटील, शहबाज मणियार, आणि संस्थाध्यक्ष अंकुशराव लोंढाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले व योगेश्वरी देवीच्या प्रतिमापूजन व दिपप्रज्वलानाने झाली.
यावेळी कला महोत्सव निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत, नाटिका आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आपले कलागुण सादर केले. उपस्थित पालक व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली.
जिजाऊ शाळेचा वार्षिक कला महोत्सव म्हणजे विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना व प्रतिभेला उजाळा देणारा एक आदर्शवत उपक्रम असल्याचे राजकिशोर मोदी म्हणाले.
उपस्थित इतर मान्यवरांनी शाळेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने तर समारोप राष्ट्रगीताने झाला.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन अंजली सिरसाठ, मनीषा गणगे, श्रावणी जाधव तर आभार प्रदर्शन सुषमा मगर यांनी केले.
शाळेचे संचालक ॲड.दयानंद लोंढाळ व मुख्याध्यापिका मोहिनी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
