चालू वार्ता माळशिरस प्रतिनिधी-राजेंद्र पिसे
नातेपुते -महा किड्स सी. बी. एस. ई स्कूल चा सांस्कृतिक कार्यक्रम, बक्षिस वितरण आणि स्थापना दिवस नुकताच पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कुमारी. भाग्यश्री संजय शेंडे (क्लास -1 अधिकारी)असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर या होत्या.
या वेळी प्रमुख पाहुन्यांनी पालकांना संबोधित करताना आपल्या पाल्याला फक्त शिक्षण हा एक उद्देश न ठेवता खेळाला पण प्रधान्य देणाऱ्या स्कूल चा पर्याय निवडावा असे सांगितले.
तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा माळशिरस तालुक्यात प्रथम कु. वैष्णवी रविंद्र कर्चे, स्वामी विवेकानंद राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, सोलापूर विभागात अबॅकस मध्ये प्रथम आरुष सुशील गांधी, लहान गट- प्रथम अद्विका विशाल फरांदे, द्वितीय तुषार सुरेश भुजबळ,तृतीय रुद्र विशाल गोरे, मोठा गट- प्रथम राजनंदिनी विठ्ठल पडर,द्वितीय शिवानी नामदेव बोडरे,तृतीय आरुष सुशील गांधी, मॅथ्स ऑलि्पियाड गट 1ला -प्रथम युविका प्रकाश भाटी,
द्वितीय स्वराज संदिप कदम,
तृतीय रुद्र विशाल गोरे, गट 2 रा -प्रथम ओजस राहुल राऊत, द्वितीय शिवन्या शंकर वाघमोडे, तृतीय असद फय्याज मुलाणी गट 3 रा- प्रथम वैष्णवी रविंद्र कर्चे, द्वितीय शंभूराज अंकुश पांढरे, तृतीय कृष्णप्रिया सचिन खुळे,
मल्लखांब जिल्हा स्तरीय स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू प्रथम रुद्र संतोष देवकर,
द्वितीय अविष्कार नारायण थिटे,
तृतीय प्रतीक अशोक मोहिते,
महा किड्स चेस प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार मास्टर.ऋषिकेश संतोष रुपनवर यास देण्यात आला. तसेच शालेय स्पर्धामध्ये प्रविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थांचा मेडलं आणि प्रशस्तिपत्र देण्यात आले.
बक्षिस वितरणास वैष्णवी हार्डवेअर तर्फे त्यांच्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ योगदान मिळाले, तसेंच विद्या प्रतिष्ठान बारामती चे प्रा. संजय खिलारे यांनी चेस प्लेयर ऑफ द इयर ची ट्रॉफी स्पॉन्सर केली.
सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गणेश वंदना, शैक्षणिक, देशभक्ती, मराठमोळी गाणी, हिंदी प्रेरणादायी गाणी, ऐतिहासिक गाणी,बालगीते यांचा समावेश होता.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष अँड.शिवशंकर पांढरे, पांढरे ड्रायविंग स्कुल चे मालक सचिन पांढरे, संस्थेचे संचालक सौ. अलका पांढरे, सौ.तेजस्विनी पांढरे, संदीप कदम, निशाताई सरगर आणि संजय शेंडे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल साळुंखे आणि शाळेचे विद्यार्थी कृष्णप्रिया खुळे व आरुष गांधी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि वाहतुक विभागाने अथक परिश्रम घेतले.
