कळंब प्रतिनिधी- समीर मुल्ला
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, छत्रपती संभाजीनगर कृती विभागाने धाराशिव तालुक्यात मोठी कारवाई करत अफूच्या अवैध लागवडीचा पर्दाफाश केला असून तब्बल 12 लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. धाराशिव तालुक्यातील खेड येथे ही कारवाई करण्यात आली असुन यात 4 शेतकरी सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मंगळवार (दि. १७) रोजी अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स छ. संभाजी नगर कृती विभाग यांना गोपनिय बातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमी आधारे खेड ता. धाराशीव येथे शेतजमीनीत मानवी मेंदुवर विपरीत परीणाम घडवून आणणा-या अफू झाडाची अवैध्यरित्या लागवड करण्यात आली आहे. अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स छत्रपती संभाजीनगर कृती विभाग यांना मिळाली पथकाने खेड ता.जि. धाराशिव येथे शेत गट नं.१४१,१४२,१५३,१७४ मध्ये छापा कार्यवाही केली तेथे शेत जमीनी वर अफु वनस्पती ची अवैध्यरित्या लागवड करुन देखभाल व रखवाली करताना मिळून आली आहे. सदर गट नंबरमधील शेतकरी १) लिंबराज पाडुरंग लोमटे, २) रामहारी नामदेव लोमटे, ३) नरहरी गोंविद लोमटे, ४) ज्ञानेश्वर वसुदेव टकले सर्व रा. खेड ता.जि. धाराशिव हे आहेत.
त्यानंतर सदर ठिकाणी कायदेशीर पंचनामा करुन अफु झाडाची एकुण लहान मोठी झाडे फुल व बोंडा सहीत उपटुन वचन करता, एकुण ८३ किलो अफु झाडे किंमत १२,३३,४५०/- (बारा लाख तेहतीस हजार चारशे पन्नास रुपये ) रुपयाचा माल मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आले आहे. सदर प्रकरणात पोलीस ठाणे ढोकी ता. धाराशिव येथे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स छत्रपती संभाजीनगर कृती विभागाचे अधिकारी सपोउपनि हनुमान पुरके यांचे फिर्यादी वरुन एन.डी.पी.एस. कायदा १९८५ कलम ८ (क), १८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर अफु लागवडीचे क्षेत्र हे यातील वरील शेतकरी यांचे शेत आहे.
सदर कार्यवाही ही अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलीस महानिरीक्षक श्रीमती शारदा राउत मॅडम, पोलीस उपमहानिरीक्षक श्री. प्रवीण पाटील साहेब, पोलीस अधिक्षक श्री. अजीत टिके साहेब, श्री. निकेश खाटमोडे साहेब. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-अधिक्षक श्री. साईनाथ ठोंबरे साहेब, पोलीस निरीक्षक श्रीमती गीता बागवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक. श्रीमती दिपाली पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, वाहेद मुल्ला, हनुमान पुरके, हवालदार शैला टेळे, सुरेश राउत, नागेश केंद्रे, निलेश सरपाळे, कैलास गाडेकर, नितीन जाधव, रविद्र साळवे, सुरज जोनवाल, ज्ञानेश्वर चव्हाण, हरीचंद्र मुंढे, अमितसिंग ठाकुर, अतुल तुपे, आम्रपाली सुर्यवंशी, ज्योती किर्तीकर, प्रियंका पवार यांनी केली आहे.
युवा वर्ग नशेच्या आहारी जात असल्याने सर्व प्रकारचे कोणतेही नशेचे गांजा, अफु, ड्रग्ज अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे, लागवड करणारे गुन्हेगारावर कार्यवाही करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथक टास्क फोर्स ची स्थापना केलेली असुन जनतेने अशा लोकांची माहीती देणेबाबत खालील संपर्क नंबर देण्यात येत आहे.
