ठाणे (19) : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तद्नंतर मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सर्व ठाणेकरांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच कळवा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे, शिवसेना गटनेते पवन कदम, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, उमेश बिरारी, दीपक झिंजाड, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे, सहायक आयुक्त ललिता जाधव, सोपान भाईक, प्र.उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.


