इगतपुरी प्रतिनिधी :- विकास पुणेकर
इगतपुरी :- इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब गावात गेल्या सात वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या उद्देशाने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यावर्षीही दि. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (लहान व मोठा गट) तसेच माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, बुद्धिबळ, स्लो सायकल, धावणे, वेशभूषा, चित्रकला व रांगोळी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या उपक्रमासाठी श्री नरेंद्र भोईर, श्री धनराज चव्हाण, श्री हरिष चव्हाण (माजी सरपंच), डॉ. गोपाळ चव्हाण, श्री वासुदेव चव्हाण, श्री भोलेनाथ चव्हाण (आगरी समाज सचिव), श्री शाम चव्हाण (माजी सरपंच), श्री विनोद चव्हाण (माजी उपसरपंच), श्री विष्णू चव्हाण (माजी सभापती), ऍड. सोपान चव्हाण, पहिलवान गोटीराम चव्हाण, डॉ. हिरामण चव्हाण, इंजि. जितेंद्र चव्हाण, इंजि. संदीप चव्हाण, श्री ज्ञानेश्वर चव्हाण, ऍड. अशोक पगारे, ऍड. राजेंद्र पगारे, श्री तुकेश चव्हाण, श्री रोहिदास चव्हाण, श्री संजय माळी, श्री मनोहर आडोळे (स्टेशन मास्टर) आदी मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमास माजी सरपंच ज्ञानेश्वर भटाटे, शिवसेना शाखा प्रमुख श्री भारत भटाटे, श्री ज्ञानेश्वर चव्हाण तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्ञानगंगा शाळेचे मुख्याध्यापक श्री पाखले सर, श्री आहेर सर व मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री येशी सर यांनी उपस्थितांचे व ग्रामस्थांचे आभार मानले.
या स्पर्धांचे आयोजन श्री नरेंद्र भोईर, श्री धनराज चव्हाण व प्रा. गोपाळ लायरे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दोन्ही शाळांच्या शिक्षकवृंदाचे विशेष सहकार्य लाभले.
माणिकखांब गावात दरवर्षी अशा उपक्रमांद्वारे शिवजयंती साजरी करून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त व नेतृत्वगुण विकसित करण्याचे कार्य सातत्याने केले जात आहे.
