दैनिक चालू वार्ता धाराशिव/ प्रतिनिधी -समीर मुल्ला
कळंब. खामसवाडी येथील शेतकरी कुटुंबातील विश्वजीत काकासाहेब शेळके यांची बँकेसाठी असलेल्या आय बी पी एस परीक्षेमधून निवड झाली आहे त्यांच्या या यशाबद्दल कळंब येथे मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्न धाराशिव प्रेस क्लब शाखा कळंबच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन व कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ, पत्रकार परिषद कळंब शाखा अध्यक्ष अमर चोंदे पत्रकार माधवसिंग राजपूत यांच्या हस्ते शाल, पुष्पहार , “जीवनातील श्वासासाठी” हे भंवरलाल जैन यांचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महादेव महाराज अडसूळ ,माधवसिंग राजपूत, हनुमंत पाटोळे यांनी यांनी कठोर परिश्रमातून व ग्रामीण भागात शिक्षण घेऊन मिळवलेल्या यशाबद्दल शेळके यांची अभिनंदन केले व मराठी भाषा गौरव दिनाबद्दल शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन, पत्रकार शिवप्रसाद बियाणी यांनी तर आभार पत्रकार शिवाजी बोबडे यांनी मानले कार्यक्रमासाठी पत्रकार दीपक माळी, महेश फाटक, बाबासाहेब शेळके, सोमनाथ शेळके यांची उपस्थिती होती.
