{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
दिवा (ठाणे):नागरिकांनी विश्वासाने दिलेल्या बहुमताचे सार्थक करत, त्यांच्या समस्या तत्परतेने सोडवण्यासाठी जनसंपर्क कार्यालये महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास आज दिवा येथे व्यक्त करण्यात आला. दिवा शहरातील प्रभाग क्रं. २७ चे नगरसेवक आदेश भगत आणि नगरसेविका दीपाली भगत यांच्या नवीन जनसंपर्क कार्यालयांचे संसदरत्न खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते आज थाटात उद्घाटन पार पडले.
यावेळी मार्गदर्शन करताना संसदरत्न खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी लोकप्रतिनिधींना मोलाचा सल्ला दिला.
“नागरिकांनी आपल्यावर जो मोठा विश्वास ठेवून भरघोस मताधिक्याने निवडून दिले आहे, त्याचे भान ठेवावे. नगरसेवक म्हणून आपली जबाबदारी पार पाडताना केवळ विभागाच्या भौतिक विकासावरच नव्हे, तर सर्वसामान्यांच्या दैनंदिन समस्या सोडविण्यावरही विशेष भर देण्यात यावा. या नव्या जनसंपर्क कार्यालयांच्या माध्यमातून नागरिकांची कामे आणि प्रश्न कशा पद्धतीने मार्गी लावता येतील, यासाठी सतत कार्यरत राहावे,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच, नगरसेवक आदेश भगत आणि नगरसेविका दीपाली भगत यांना त्यांच्या नव्या जनसंपर्क कार्यालयासाठी आणि पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.
कार्यालयाच्या उद्घाटनासोबतच या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकीचा एक उत्तम उपक्रमही राबविण्यात आला. एका भगिनीला स्वयंरोजगारासाठी ‘सुप्रीम टीव्हीएस’ (Supreme TVS) रिक्षाची प्रातिनिधिक चावी खासदार शिंदे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.
या दिमाखदार सोहळ्याला परिसरातील अनेक महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने कल्याण ग्रामीण चे आमदार आमदार राजेश मोरे, शिवसेना दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी, नगरसेवक शैलेश पाटील, बाबाजी पाटील, दीपक जाधव, नगरसेविका साक्षी मढवी, अर्चना पाटील, स्नेहा पाटील, माजी नगरसेवक अमर पाटील, नितीन पाटील, उपशहर प्रमुख गणेश मुंडे, विभाग प्रमुख गुरुनाथ पाटील, उमेश भगत आदींसह मोठ्या संख्येने स्थानिक शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

