प्रतिनिधी : स्वाती हडकर
चिपळूण : २६ फेब्रुवारी रोजी नगर परिषद चिपळूण तर्फे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये काँग्रेस पक्षाचे गटनेते साजिद सरगुरोह यांनी महत्त्वाची मागणी मांडली.
नगर परिषद नियम १९६५ अंतर्गत होणाऱ्या सर्व सभा जनतेसाठी लाईव्ह प्रसारित करण्यात याव्यात, अशी ठोस मागणी त्यांनी केली.
सभागृहातील संपूर्ण कामकाज जनतेसमोर थेट प्रसारित झाल्यास नागरिकांना निर्णय प्रक्रियेची माहिती मिळेल, प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होईल तसेच कामकाजात पारदर्शकता वाढेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नगर परिषदेत घेतले जाणारे विविध विकासकामांचे निर्णय, अर्थसंकल्पीय तरतुदी, ठराव आणि चर्चांचा आढावा नागरिकांन समोर यावा संकेतस्थळावरून लाईव्ह प्रक्षेपण सुरू करावे, अशीही सूचना त्यांनी केली.
या मागणीवर प्रशासनाने तांत्रिक बाबींचा अभ्यास करून याबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
