प्रतिनिधी/ स्वाती हडकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय भव्य रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात आणि चांगल्या प्रतिसादात पार पडली.
स्पर्धेत विविध वयोगटातील खेळाडूंनी सहभाग घेत आपली बुद्धिमत्ता आणि कौशल्याचा उत्कृष्ट नमुना सादर केला.
सदर स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी जिल्हा परिषद सदस्य श्री. प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष श्री. विनोद जानवरकर, श्री. संदेश साळवी, श्री. स्वप्नील घारे, श्री. निलेश जामसुतकर, श्री. प्रणय कदम, श्री. नंदकुमार मनोहरकर, श्री. मिलिंद कदम, श्री. सूरज घाग, श्री. समीर गडदे, श्री. साहिल गायकर, श्री. निलेश चव्हाण, श्री. अजय वाजे, श्री. निलेश साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
