नागेश पवार, ठाणे जिल्हा प्रतिनिधी (दैनिक चालु वार्ता)
ठाणे: भारतीय क्रिकेट संघाने आपल्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत (सेमीफायनल) दिमाखात प्रवेश केला आहे. आतापर्यंतच्या सर्वच सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंनी दाखवलेला अप्रतिम खेळ आणि विजयी घोडदौड क्रिकेट चाहत्यांची मने जिंकणारी ठरली आहे.
या शानदार कामगिरीमुळे संपूर्ण देशभरासह ठाणे जिल्ह्यातही क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे आणि जल्लोषाचे उधाण आले आहे. फलंदाजांची आक्रमक शैली आणि गोलंदाजांची अचूक मारा यामुळे प्रतिस्पर्धी संघांना नामोहरम करण्यात भारताला यश आले. प्रत्येक सामन्यात कर्णधाराने आखलेली रणनिती आणि खेळाडूंचा उत्कृष्ट सांघिक खेळ या विजयाचा मुख्य पाया ठरला.
उपांत्य फेरीत पोहोचल्यामुळे भारताच्या विश्वचषक विजयाच्या आशा अधिक पल्लवित झाल्या आहेत. आता उपांत्य फेरीत भारतीय संघाचा मुकाबला कसा रंगणार आणि संघ अंतिम फेरीत मजल मारून विश्वचषकावर नाव कोरणार का, याकडे सर्व क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.
