नागपूर प्रतिनिधी जयंत चौव्हान
परिसरातील अण्णामोड येथील शिवालयात तिथीनुसार साजऱ्या करण्यात येणाऱ्या शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेच्या वतीने शिवालय परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
शिवालय परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते. तसेच विद्युत रोषणाई करून उत्सवाला विशेष रंगत आणण्यात आली होती. सकाळी विधिवत पूजा-अर्चा करून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर शिववंदना सादर करून उपस्थितांनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय”च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना नेते अशोक झिंगरे यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान शिवाजी महाराजांच्या कार्याचा व पराक्रमाचा उल्लेख करून उपस्थितांनी त्यांच्या आदर्शांचे स्मरण केले. यानंतर उपस्थित भाविकांना व ग्रामस्थांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी भाजपचे वरिष्ठ नेते रमेश जैन, सेनाचे वरिष्ठ नेते अशोक झिंगरे, राधाकिशन मित्तल, शिवसेना शहरप्रमुख सुरेंद्र कच्छावे, ज्येष्ठ समाजसेवक बबलू ठाकूर, माजी उपसरपंच सचिन गजभिये, माजी सरपंच अशोक वंजाळ, खापरखेडा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुधीर फेंडर, सुरेश पौनिकर, राजू बोरकर,बलदेव श्रीवास्तव, सुरेश केने,नरेन्द्र मोरे, दिनेश गुडघे,जयंत झिंगरे,विकास बारई, बबलु मित्तल, चौधरी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. धार्मिक वातावरणात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे अण्णामोड परिसरात शिवजयंतीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाल्याचे पाहायला मिळाले.
