पुणे:पुण्यातील लोहगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याची घटना समोर आली आहे.
एवढेच नाही तर पिस्तुलाचा धाक देखील दाखवला, अंगावर गरम पाणी ओतण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुळशीतील संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल लोखंडे आणि पत्नी सुवर्णा लोखंडेविरोधात लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
काय नेमकं प्रकरण?
या प्रकरणातील पीडित विवाहित महिला लग्नात माहेरच्या मंडळींनी सुमारे २ कोटी रुपये खर्च केले होते. यामध्ये दोन किलो चांदी आणि एक आलिशान चारचाकी गाडी देखील देण्यात आली होती. मात्र सासरच्या मंडळींना याचे समाधान झाले नाही. लोखंडे कुटुंबाला शेअर मार्केटमध्ये सुमारे २ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी सुनेकडे माहेरून पैसे आण्यासाठी तगादा लावला.
शेअर मार्केटचे कर्ज फेडण्यासाठी तिच्या डोक्याला पिस्तूल लावल्याचा प्रकार केला होता. एवढेच नाही तर तिच्या अंगावर गरम पाणी ओतण्याचा प्रयत्न करण्यात आला. या अमानवीय छळामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
लोखंडे दाम्पत्याला न्यायालयाचा दणका
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी अनिल लोखंडे आणि सुवर्णा लोखंडेने अटकेपासून बचाव करण्यासाठी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. पण न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. पुण्यातील प्रतिष्ठित कुटुंबात घडलेल्या या प्रकारामुळे पुन्हा एकदा हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लोहगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
किरकोळ वादातून भीषण हत्या; कामगाराला मजल्यावरून ढकलून 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकर वाडी परिसरात एका बांधकाम साईटवर दोन कामगारांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यात एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
