होर्मुझ संकटात इराणची घोषणा !
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणनेभारताला मोठा दिलासा दिला आहे. भारताला आपला ‘मित्र देश’ म्हणत इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याचे आश्वासन दिले आहे.
तसेच, भारतीय ध्वज असलेली जहाजे आणि त्यावरील नाविक पूर्णपणे सुरक्षित असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यामुळे भारताचा एलपीजी आणि कच्च्या तेलाचा पुरवठा अखंडित राहणार आहे.
आमचे भारतीय मित्र सुरक्षित हातात आहेत, काळजी नसावी…
अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांनंतर हा महत्त्वाचा जलमार्ग विस्कळीत झाला होता. मात्र, इराणच्या भारतातील दूतावासानं ‘एक्स’वर पोस्ट करत, “आमचे भारतीय मित्र सुरक्षित हातात आहेत, काळजी नसावी,” असे म्हटले आहे. जगाच्या एकूण २० टक्के ऊर्जा पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या या मार्गावरून इराणने केवळ भारत, चीन, रशिया, इराक आणि पाकिस्तान यांसारख्या मित्र राष्ट्रांच्या जहाजांनाच परवानगी दिली आहे.
अद्यापही भारतासाठी ऊर्जा साठा घेऊन येणारी १९ जहाजे या मार्गावर अडकलेली आहेत –
आतापर्यंत किमान आठ भारतीय जहाजे या मार्गावरून सुखरूप बाहेर पडली आहेत, यात सुमारे ९४,००० टन एलपीजी वाहून नेणाऱ्या ‘बीडब्ल्यू टायर’ आणि ‘बीडब्ल्यू एल्म’ या जहाजांचा समावेश आहे. मात्र, अद्यापही भारतासाठी ऊर्जा साठा घेऊन येणारी १९ जहाजे या मार्गावर अडकलेली आहेत. बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये १० विदेशी ध्वज असलेली जहाजं भारतासाठी ऊर्जा कार्गोसह अडकली आहेत. ८ भारतीय ध्वज असलेली जहाजे आहेत. संघर्षाच्या काळात या अरुंद सामुद्रधुनीत एकूण ५०० जहाजे अडकली होती.
