मावळ प्रतिनिधी
देहूरोड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये जनावरांची अवैधरीत्या कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या ७ जणांसह ४०० किलो मांस,एक टेम्पो ,सत्तुर,चाकू असा ५ लाख ८० हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी ( दि.२ ) सकाळी साडेआठच्या सुमारास देहूरोड शितळानगर १, थॉमस कॉलनी ,आईस फॅक्टरी जवळ करण्यात आली.
हसन मोहम्मद कुरेशी (वय ६०,राह. शितळानगर देहूरोड), इरफान आसन कुरेशी ( वय ३२,शितळानगर देहूरोड),शाहरुख मकसूद कुरेशी ( वय ३३ सुखवाणी नो कमिंग खरळवाडी पिंपरी), नवीन फारुक रेशी ( वय ३२, आंबेडकर नगर देहूरोड ),इफ्तिकर बाबूलाल कुरेशी ( वय ३८,आंबेडकर नगर देहूरोड ), मोहम्मद शहीद चकोली ( वय ३५ आंबेडकर नगर देहूरोड) आणि फारूक अमीन कुरेशी ( वय ५५ ,राह.आंबेडकर नगर देहूरोड) असे याप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत.
प्रशांत गुलाबराव वाबळे (वय ३८, पोलीस हवालदार देहूरोड यांनी याप्रकरणी फिर्याद नोंदवली आहे.
पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार शितळा नगर परिसरात अवैध कत्तल करून मांसाची वाहतूक व विक्री करत असल्याची माहिती बातमीदाराकडून मिळाल्यावर गुन्हे शाखा पोलीस पथकाच्या साह्याने जनावर कत्तल करणाऱ्या पत्र्याच्या शेड वर छापा मारला घटनास्थळावरती जनावरांचे कत्तल करून विक्रीसाठी टेम्पोत भरलेले मास आढळून आला. याप्रकरणी अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.
