दैनिक चालू वार्ता तलासरी प्रतिनिधी -सुधीर घाटाळ
तलासरी,दि. ५ एप्रिल २०२६,भारतीय जनता पार्टी तलासरी मंडळाच्या वतीने वनवासी विकास प्रकल्प, तलासरी येथे आयोजित ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत प्रशिक्षण वर्ग उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरित्या पार पडला.
या प्रशिक्षण वर्गास भाजपा जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनातून कार्यकर्त्यांना संघटनात्मक बळकटी, कार्यपद्धतीतील सुसूत्रता आणि जनसंपर्क अधिक प्रभावी करण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
कार्यक्रमास विविध पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान कार्यकर्त्यांना संघटन विस्तार, बूथ स्तरावर पक्ष मजबूत करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि पक्षाच्या विचारधारेबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी विविध विषयांवर मान्यवर वक्त्यांनी मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. त्यामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढून आगामी काळात अधिक जोमाने व संघटितपणे काम करण्याची प्रेरणा मिळाल्याचे दिसून आले.
या प्रशिक्षण उपक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये पक्षवृद्धीसाठी दृढ निश्चय निर्माण झाला असून कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने पार पडले.
