दौंड : प्रतिनिधी अंकुश काळे
उन्हाळ्याच्या तीव्र पार्श्वभूमीवर वन्य प्राण्यांना पाण्याची टंचाई भासत असताना, कुसेगाव येथील जनहित फाउंडेशनच्या “पुण्य कर्म अभियानातून” एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. युवा उद्योजक विक्रांत गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त सुपे अभयारण्यात पाण्याचा टँकर पाणवठ्यात सोडून वन्यजीवांना दिलासा देण्यात आला.
अध्यात्मिक गुरु तात्या महाराज ढमाले यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या या अभियानांतर्गत वन विभागाच्या सहकार्याने प्राणीमात्रांसाठी पाणी व चाऱ्याची व्यवस्था केली जात आहे. या उपक्रमामुळे उष्णतेत त्रस्त वन्यजीवांना मोठा आधार मिळत आहे.
यावेळी मयुरेश्वर अभयारण्याचे वनपाल अनिल खोमणे यांनी विक्रांत गायकवाड यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच जनहित फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमास जय शिवसंग्राम पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत साळुंखे, वनरक्षक आयान सय्यद तसेच वन कर्मचारी बापू शितोळे, कैलास शितोळे, प्रवीण गरदडे, धीरज शितोळे, सचिन फडतरे, गुणवंत शितोळे, सुमित गायकवाड, रवी श्रीसिल्ला, सुरज केसे, अरबाज तांबोळी आदी उपस्थित होते.
जनहित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोज फडतरे यांनी सर्वांचे आभार मानत, या सामाजिक उपक्रमात अधिकाधिक लोकांनी सहभागी होऊन वन्यजीव संवर्धनासाठी हातभार लावावा, असे आवाहन केले
