UAE ने इराणकडूनच मागतला नुकसानीचा हिशोब…
सध्या मध्यपूर्वेतील तणाव काही निवळण्याचे नाव घेईना.इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यामुळे वाद आणखी वाढत चालला असातना या वादा आता संयुक्त अरब अमिराती ने देखील उडी घेतली आहे. यूएई आणि इराणमध्ये आता होर्मुझ आणि नुकसान भरपाईवरुन वाद पेटला आहे. इराणने मांडलेल्या १० कलमी प्रस्ताववर देखील यूएईने प्रश्न उपस्थित केला आहे. होर्मुझवरुन आक्रमक पवित्रा घेत इराणलाच आरसा दाखवला आहे.
इराणनेच द्यावी नुकसान भरपाई
इराणच्या अटींमध्ये पुननिर्माणासाठी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या भरपाईवरुन मोठा वाद पेटाला आहे. यावर यूएईने आक्रमक भूमिका घेत अरब देशांवरील हल्ल्यांसाठी इराणनेच नुकसान भरपाई दिली पाहिजे असे म्हटले आहे. युद्धविरामानंतरही इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझ कोणत्याही अटींशिवाय खुला ठेवणार असल्याची खात्रीही यूएईने मागितली आहे. यूएइने म्हटले आहे की, गेल्या ४० दिवसांत इराणच्या हल्ल्यांमुळे अरब देशांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची जबाबादीर घेण्यास आणि नुकसान भरपाई करण्यास यूएईने सांगितले आहे.
इराणच्या युद्धामुळे झालेल्या नुकसानीसाठी आणि पुनर्निमाणासाठी त्यांना निधी मिळाला पाहिजे. यावर यूएईच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, इराणने कोणत्याही चिथावणीशिवाय आखाती देशांवर हल्ले केले. नागरी ठिकाण, उर्जा प्रकल्प आणि पायाभूत सुविधांना लक्षय केले. हजारो बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे, क्रझ क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ल्यांमुलए आखाती देशांचे मोठे नुकसान झाले आहे. याची भरपाई इराणचे द्यायला हवी.
यूएईने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही या युद्धाचा भाग नव्हतो, तरीही आमच्या नागरी पायाभूत सुविधा आणि उर्जा प्रकल्पांवर हल्ले करण्यात आले. याची जबाबदारी इराणने स्वीकारण्याची वेळ आहे. याच वेळी यूएईने संयुक्त राष्ट्र परिषदेत ठरावात मांडला असून इराणच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे.
इराण यूएई तणावाचा परिणाम
सध्या अमेरिका इराण तणावात नुकसानभरपाईवरुन सुरु झालेल्या वादामुळे पुन्हा एकदा होर्मुझचा मार्ग बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे युद्धबंदीचा मार्ग खडतर झाला असून पुन्हा भडका उडण्याची शक्यता आहे. यामुळे जगावर पुन्हा महागाईचे सावट उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
