SIT चौकशीदरम्यान खरातची प्रतिक्रिया; गुन्हा कबूल केल्याची माहिती !
भोंदू अशोक खरात याच्या SIT तपासात मोठा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. चौकशीदरम्यान खरातने ‘माझं मरण इथेच आहे’ अशी प्रतिक्रिया दिल्याची सूत्रांची माहिती आहे. यासोबतच फसवणुकीचा गुन्हा कबूल केल्याचीही महत्त्वाची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आतापर्यंत खरातवर १५ गुन्हे दाखल असून, धार्मिक विधींच्या नावाखाली लैंगिक शोषण, श्रद्धेचा गैरवापर, आर्थिक फसवणूक आणि महिलांची लूट यासारख्या गंभीर आरोपांमुळे खरात प्रकरण राज्यभर चर्चेत आहे.
श्रद्धाळूंच्या भावनांचा गैरवापर
खरातने भोंदूगिरी करताना श्रद्धाळूंच्या भावनांचा गैरवापर केला. धार्मिक अनुष्ठान, पूजा-पाठ आणि विशेष विधींच्या नावाखाली महिलांना लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप आहेत. अनेक महिलांनी त्याच्याकडून आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे. खरातकडून बनावट अधिकारी म्हणून दाखवून लोकांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचेही उघड झाले आहे. त्याने ईडी आणि आयकर विभागाची भीती दाखवून अनेकांना फसवले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मोठी कारवाई
या प्रकरणात आता Enforcement Directorate (ईडी) ने मोठी कारवाई केली आहे. अशोक खरात आणि त्यांची पत्नी कल्पना खरात यांची तीन बँक खाती ईडीने सील करण्यात आली आहेत. संशयास्पद आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू असून, नाशिक, पुणे, मुंबई आणि अहिल्यानगर येथील खात्यांची तपासणी केली जात आहे. कोट्यवधी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांची पडताळणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. खरातच्या मालमत्तांवरही लवकरच टाच बसण्याची शक्यता आहे. मनी लॉन्डरिंग प्रकरणी ईडीने स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.
SIT च्या तपासात आणखी धक्कादायक माहिती
SIT च्या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरातने बनावट दस्तऐवज, धार्मिक संस्था आणि आर्थिक गैरव्यवहार रचून मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अनेक ठिकाणी त्याने ‘बाबा’ किंवा ‘संत’ म्हणून ओळख निर्माण करून लोकांना आकर्षित केले आणि त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला.
आणखी काही संशयितांना अटक होण्याची शक्यता
पोलिस आणि ईडीच्या संयुक्त कारवाईमुळे खरात प्रकरण अनेक खुलासे होत आहेत. या प्रकरणात आणखी काही संशयितांना अटक होण्याची शक्यता आहे. खरातच्या पत्नी कल्पना खरात यांच्याही भूमिकेची चौकशी केली जात आहे.
