भारतीय डाळ, साखर, भाजीपालासह दैनंदिन वस्तूंवर 80% पर्यंत शुल्क…
बालेन यांच्या नेतृत्वात पूर्ण बहुमताने अलीकडेच नेपाळमध्ये नवीन सरकार स्थापन झालं आहे. मित्र नेपाळमध्ये नवीन सरकार सत्तेवर आल्यापासून पंतप्रधान बालेन शाह यांना भारताकडून प्रचंड प्रेम मिळालं आहे, विशेषतः तरुण पिढी शाह आणि त्यांच्या निर्णयांबद्दल अत्यंत उत्साही होती, पण आता बालेन यांनी आपला खरा चेहरा दाखवायला सुरुवात केली आहे.
नेपाळ सरकारचा भारताविरुद्ध आदेश
सत्तेवर आल्यापासून त्यांनी भारताच्या विरोधात आपला पहिला निर्णय जारी केला आहे. या निर्णयाचा परिणाम भारत-नेपाळ सीमावर्ती भागात लगेचच जाणवू लागला असून नेपाळच्या सीमाशुल्क विभागाने सीमेवर भारतीय व्यापाऱ्यांचा लाखो रुपयांचा मालही जप्त केला आहे.
नेपाळ सरकारने सीमापार व्यापारावरील पकड अधिक घट्ट केली असून या आदेशानुसार नेपाळमधून भारतात किंवा भारतातून नेपाळमध्ये जाणाऱ्या 100 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कोणत्याही वस्तूंवर आता सीमा शुल्क आकारले जाईल. नेपाळमध्ये सीमा शुल्काला ‘भन्सर’ म्हटले गेले आहे. नवीन आदेशानुसार 5% ते 80% पर्यंत सीमा शुल्क आकारले जाईल आणि त्यावर 13% VAT जोडला जाईल.
या आदेशामुळे नेपाळला लागून असलेल्या उत्तर प्रदेश आणि बिहारच्या सीमावर्ती भागांमध्ये गोंधळ झाला असून गेल्या 24 तासांत नेपाळ सीमा पोलिसांनी भैरहवा आणि सोनाउली सीमेवर अंदाजे 15 लाख रुपयांचा माल जप्त केला गेला आहे.
नेपाळ सरकारच्या निर्णयाचा भारतावर कुठं परिणाम
टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार नेपाळ सरकारच्या या आदेशाचा सर्वात मोठा परिणाम लहान व्यवसायांवर होताना दिसत आहे. भारत आणि नेपाळमध्ये Trade अनेक दशकांपासून अव्याहतपणे सुरू असून तेथून कमी किमतीत माल आयात करून भारतीय व्यवसायांना दीर्घकाळापासून फायदा होत आहे.
नेपाळसोबत बिहारची 378 किलोमीटरची सीमा आहे, पण आता सीमेत प्रवेश करणाऱ्या भारतीय मालावर सीमा शुल्क आकारले जात आहे. भारताच्या सीमावर्ती भागातील व्यवसाय पूर्वी नेपाळी खरेदीदारांवर अवलंबून होते, पण या नव्या आदेशानंतर आता त्यांना स्पष्ट नुकसान झालं आहे.
दुसरीकडे, बालेन शाह यांच्या सरकारच्या या नव्या निर्णयाचा केला भारतावरच नाही तर स्वतः नेपाळी ग्राहकांवरही परिणाम होणं अपेक्षी आहे. 100 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तूंवर सीमा शुल्क भरावे लागणार आहे, ज्यामुळे नेपाळी लोक प्रामुख्याने भारतातून औषधे, कापड, तयार कपडे, सिमेंट, सौंदर्यप्रसाधने, विद्युत उपकरणे, भांडी, खाद्यपदार्थ, बिस्किटे, केक, भाजीपाला, मसाले, फळे आणि दुधाच्या आयातीवर जास्त पैसे मोजावे लागतील.
