इराण आणि अमेरिका युद्धाला एक महिन्यापेक्षा अधिक काळ झाला. युद्ध कोणत्याही परिस्थिती थांबवले पाहिजे, अशी मागणी होत आहे. या युद्धाचा परिणाम जगाला भोगावा लागत आहे. मात्र, युद्धाला जसे जसे दिवस जात आहेत, तशी परिस्थिती अधिक चिघळत आहे.
इराण आणि अमेरिका युद्धात जग होरपळत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्यावेळी युद्ध सुरू झाले, त्यावेळी म्हटले होते की, हे युद्ध फार तर फार 4 आठवडे सुरू असले. युद्ध थांबल्यानंतर आपोआप कच्च्या तेलाच्या किमती स्थिर होतील. मात्र, प्रत्यक्षात इराणने ज्याचा विचारही केला नाही, असे प्रतिउत्तर इराणकडून देण्यात आले. अमेरिकेला अपेक्षा होती, त्यापेक्षा अधिक काळ युद्ध सुरू आहे. सध्या इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धसंधीची घोषणा करण्यात आली. मात्र, परिस्थिती चिघळताना दिसत आहे.
होर्मुज खाडी आता अगोदरसारखी जहाजांची ये-जा करणारी जगातील महत्वाची खाडी राहिली नाही तर युद्धाचे मैदान बनले आहे. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने तेलाची निर्यात आणि आयात ठप्प आहे. एलपीजीचे संकट आहे. इराणकडून सुरूवातीला सांगितले गेले की, आमच्या मित्र देशांकरिता फक्त होर्मुज खाडी खुली आहे. मात्र, त्यावेळीही तणाव होता.
अमेरिकेने होर्मुज खाडी खुली आणि सुरक्षित करण्यासाठी काही देशांची मदत मागितली. मात्र, अमेरिकेच्या मदतीला एकही देश पुढे आला नाही. होर्मुज खाडीतून जहाजांना जाऊ देण्यासाठी विशिष्ट रक्कम आकारली जात होती. यादरम्यानच इराणला धक्का देत अमेरिकेने मोठी नाकेबंदी इराणभोवती केली. इराणभोवती अमेरिकेच्या युद्धनाैका तैनात करण्यात आल्या.
त्यामध्येच आता अमेरिकेकडून अत्यंत मोठी घोषणा करण्यात आली. अमेरिकेने स्पष्ट शब्दात म्हटले आहे की, आम्ही इराणची नाकेबंदी काढणार नाहीत. अमेरिकेच्या या घोषणेने जगात खळबळ उडाली. आता प्रश्न पुन्हा तोच आहे की, इराणसोबतच्या युद्धानंतरही होर्मुज खाडीत अमेरिकेचा दबाव राहणार का? कारण काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, होर्मुज खाडीत शुक्ल आकारण्याचा खरा अधिकार अमेरिकेकडून आहे.
