शिंदे-पवारांना धक्का देणार; शिवसेना ठाकरे पक्षाच्या शिलेदाराची भविष्यवाणी…
महायुतीचं 2029चे राजकारण कसे असेल, यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. भाजप 2029च्या निवडणुकीत एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादीला बाजूला सारेल, असे विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
विनायक राऊथ यांच्या या भविष्यवाणीचे महायुतीकडून काय प्रतिक्रिया येते, विशेष करून, एकनाथ शिंदे शिवसेना काय प्रतिक्रिया देते, याकडे आता लक्ष लागलं आहे.
देशात नुकताच, पाच राज्यातील विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. या भाजपने(BJP)दमदार कामगिरी केली आहे. विशेष करून, पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर घडवत, तिथं सत्ता स्थापनेची लगबग सुरू झाली आहे. या विजयाचे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे, तर देशभरातील प्रादेशिक पक्ष सावध झाले आहेत.
महाराष्ट्रात देखील पश्चिम बंगालमधील भाजपच्या विजयावर विश्लेषण केले जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे (ShivSena UBT) रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी, यावर मोठी भविष्यवाणी केली आहे. अजित पवार राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे भावी मुख्यमंत्री, असे बॅनरवर झळकले आहेत, यावर प्रतिक्रिया देताना, त्यांनी ही भविष्यवाणी केली.
विनायक राऊत म्हणाले, “सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं किंवा नाही, हा त्यांचा पक्षाचा, महायुतीचा प्रश्न आहे. सुनेत्रा पवार यांना बारामतीकरांनी अजितदादांनंतर मोठ्या मताधिक्यांनी निवडून दिलं आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांना त्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान व्हावं, हे वाटणं सहाजिक आहे.”
‘2029सालची निवडणूक भाजप स्व-ताकदीवर लढेल, यात एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी बाजूला फेकलेले असतील,’ अशी मोठी भविष्यवाणी विनायक राऊत यांनी केली.
तसंच, कणकवलीचे संदेश पारकर हे पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. विनायक राऊत यांनी, संदेश पारकर कणकवली निवडणूक जिकल्यानंतर त्यांची वाटचाल एकनाथ शिंदे शिवसेनेच्या दिशेने सुरू होती. मात्र आम्ही त्यांच्यावर पाणी सोडलं आहे, असे म्हटलं आहे.
