पाहा महत्वाच्या तारखा…
यावर्षी आषाढी एकादशी 25 जुलै रोजी आहे. त्यानिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडून जाहीर करण्यात आले आहे.
त्यानुसार ज्येष्ठ वद्य अष्टमीला (बुधवार 8 जुलै) आळंदी येथून दुपारी 3 वाजता पंढरपूरकडे प्रस्थान होईल. पहिला मुक्काम आळंदी येथेच असणार आहे.
संपूर्ण मुक्कामांचे वेळापत्रक –
9 जुलै -भवानीपेठ पुणे
10 जुलै – पुणे
11 जुलै – सासवड
12 जुलै – सासवड
13 जुलै – जेजुरी
14 जुलै – वाल्हे
15 जुलै – लोणंद
16 जुलै – तरडगाव
17 जुलै – फलटण
18 जुलै – बरड
19 जुलै – नातेपुते
20 जुलै – माळशिरस
21 जुलै – वेळापूर
22 जुलै – भंडीशेगाव
23 जुलै – वाखरी
24 जुलै – पंढरपूर
25, 26 , 27 , 28 जुलैला पंढरपूर येथेच मुक्काम असेल तर 29 जुलैला परतीचा प्रवास सुरु होईल. आणि 8 ऑगस्ट रोजी पालखी सोहळा आळंदी मुक्कामी पोहोचेल.
रिंगण सोहळे –
16 जुलैला लोणंद मुक्कामावर निघाल्यावर तरडगाव मुक्कामाच्या आधी चांदोबाचा लिंब येथे दुपारी पहिले उभे रिंगण.
20 जुलैला नातेपुते मुक्कामाहून माळशिरस मुक्कामाकडे जाताना सायंकाळी पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण.
21 जुलैला माळशिरस मुक्कामाहून वेळापूर मुक्कामाकडे जाताना खुडुसफाटा येथे दुसरे गोल रिंगण.
22 जुलैला वेळापूर मुक्कामाहून भंडीशेगाव मुक्कामाकडे जाताना ठाकूरबुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण.
23 जुलैला भंडीशेगाव मुक्कामाहून वाखरी मुक्कामाकडे जाताना बाजीरावची विहिर येथे दुसरे उभे आणि चौथे गोल रिंगण.
24 जुलैला वाखरी मुक्कामाहून पंढरपूर मुक्कामाकडे जाताना पादुकाजवळ उभे 3 रे उभे रिंगण.
15 जुलैला दुपारी निरा येथे संत ज्ञानेश्वर महाराज पादुकांना नीरा स्नान.
पुण्यातील मुक्काम जैसे थे –
पुण्यातील मुक्कामाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या लेखी हमीपत्रासह जागेच्या विस्तारीकरणाचे आश्वासन विचारात घेऊन, यंदाही पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील विठोबा मंदिर येथेच करण्याचा निर्णय संस्थान कमिटीने घेतला आहे.
पत्रकार परिषद घेऊन संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडून पालखी सोहळ्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. यावेळी पालखी सोहळा मालक आरफळकर, प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे आणि विश्वस्त रोहिणी पवार, दिंडी समाजचे भाऊसाहेब गोसावी उपस्थित होते.
