
दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी:-अनंता टोपले
मोखाडा : ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या पालघर जिल्हा अध्यक्षपदी जयराम नडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, रोजगार हमी योजना सक्षमपणे राबवण्यासाठी रोजगार सेवकांचे मोलाचे योगदान आहे ,यासाठी नडगे हे नेहमीच कटिबद्ध असतात, तसेच ते सामाजिक कार्यायात नेहमीच अग्रेसर असून त्याबरोबर रोजगार सेवकांची अडी अडचणी समस्या मानधानाचा प्रश्न ,रोजगार सेवकांना शासन पातळीवर विविध सोयीसुविधा मिळाव्यात ,यासाठी पाठपुरावा करून अनेक वेळा आंदोलने देखील त्यांच्या नेतृत्वाखाली झाली आहेत, याच कामाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विलास जोगदंडे यांनी नियुक्ती पत्र देऊन त्यांची निवड केली आहे,
ग्राम रोजगार सेवकांचे विविध प्रश्न असून रोजगार सेवकांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेणे,
रोजगार सेवकांचे मानधन त्याच्या खात्यावर जमा करणे, शासकीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा ग्राम रोजगार सेवकांना द्या ,रोजगार सेवकांना पीएफ ,इन्शुरन्स ,विमा, अल्पो आहार , प्रवास भत्ता द्या ,अशा विविध मागण्या वर्षानुवर्ष खितपत पडल्या असून ह्या मागण्या सोडवण्यासाठी शासन पातळीवर आक्रमकपणे प्रयत्न करीन असे नडगे यांनी बोलताना सांगितले