
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- – प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड – महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ अर्थातच महावितरण कंपनी तर्फे कंधार तालुक्यातील कुरुळा बीटचे प्रधान तंत्रज्ञ या पदावर कार्यरत असलेले कुशल कर्मचारी श्री प्रशांत गोविंदराव कांबळे यांना 01 मे 2022 रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून व कामगार दिनानिमित्ताने महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या वतीने गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार देऊन यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला या प्रसंगी नांदेड डिव्हिजन चे सर्वच वरिष्ठ मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते प्रधान तंत्रज्ञ प्रशांत कांबळे यांच्यासह 12 विद्युत कर्मचाऱ्यांचा सुद्धा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार देऊन विद्युत महामंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
प्रधान तंत्रज्ञ श्री प्रशांत गोविंदराव कांबळे यांना गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे प्रशांत कांबळे साहेबांचे नांदेड व नांदेड परिसरात व कार्यनिष्ठ व कर्तव्यावर एकनिष्ठपणे कुरुळा नगरीत कर्तव्य पार पाडत असल्यामुळे कुरुळा व कुरुळा परिसरातील त्यांचे मूळ गाव दिग्रस बुद्रुक या गावी व परिसरात त्यांचे अभिनंदन करून कौतुक केले जात आहे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.