प्रतिनिधी : स्वाती हडकर
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील खेंड परिसरात रंगपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.
खेंड येथील महालक्ष्मीची पालखी परिसरातून निघताच रंग खेळण्यास सुरुवात झाली.
तरुणांनी एकमेकांवर रंग उधळत आनंदोत्सव साजरा केला.
ढोल-ताशांच्या गजरात रंगपंचमीचा खेळ रंगला होता. विशेष म्हणजे या उत्सवात तरुणींचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहायला मिळाला.
संपूर्ण परिसर रंगांनी न्हाऊन निघाला असून नागरिकांनीही या उत्सवाचा आनंद घेतला.
दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडूनही परिसरात गस्त घालण्यात येत असल्याचे पाहायला मिळाले
