
दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -शहाबाज मुजावर
पन्हाळा येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शुक्रवार दि. ६ मे रोजी नॅशनल लेव्हल टेक्निकल ईव्हेंट ‘परिक्रमा २०२२’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘विद्यार्थ्यांच्यामध्ये पुस्तकी ज्ञानापैक्षा संशोधन ज्ञानाची अधिक भर पडावी यासाठी या टेक्निकल ईव्हेंटचे आयोजन केले आहे’ असे प्रतिपादन संजीवन ग्रुप ऑफ स्कूलचे चेअरमन पी. आर. भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले. यावेळी संस्थेचे सहसचिव एन. आर. भोसले, कॉलेजचे प्राचार्य डॉ. मोहन बी. वनरोट्टी उपस्थित होते.
चेअरमन पी. आर. भोसले पुढे बोलताना म्हणाले की, इंजिनिअरींग कॉलेजच्या स्थापनेनंतर गेली १० वर्षे या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात येत आहे. सहसचिव एन. आर. भोसले यांनी सांगितले की कोरोना कालावधीची दोन वर्षे वगळता हा कार्यक्रम कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. प्राचार्य डॉ. मोहन बी. वनरोट्टी म्हणाले की, परिक्रमा या टेक्निकल ईव्हेंटसाठी संजीवन कॉलेजसह महाराष्ट्र व कर्नाटक येथून जवळजवळ ६० कॉलेजचा समावेश असून १००० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. सहभागी विद्यार्थ्यांपैकी विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांना एकूण १ लाख रुपयांचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
परिक्रमा २०२२ या कार्यक्रमामध्ये सी कोडीगो, प्रोजेक्ट कॉम्पींटेशन, पोस्टर प्रेजेंटेशन, बॅटल ग्राउंड मोबाईल इंडिया, पीएसई ऑनलाइन फुटबॉल टूर्नामेंट, शार्क टँक प्रोजेक्ट, ब्रेन टेस्टर, फिल्ड मास्टर आणि बॉक्स क्रिकेट या प्रकारच्या स्पर्धांचा समावेश आहे. या ईव्हेंटचे रजिस्ट्रेशन शुक्रवार दि. ६ मे रोजी पर्यंत चालू राहणार असून सकाळी ९ वाजता कार्यक्रमाची सुरुवात होईल. या ईव्हेंटसाठी अभियांत्रिकी कॉलेजच्या जास्तीत जास्त मुलांनी रजिस्ट्रेशन करून सहभाग नोंदवावा असे आवाहन प्राचार्य डॉ. मोहन बी. वनरोट्टी यांनी यावेळी केले. पत्रकार परिषदेसाठी विभागप्रमुख प्रा. राहुल नेजकर, प्रा. तेजश्री देवकर, डॉ. रणजीत इंगवले, डॉ. अजय मस्के, संग्राम पाटील उपस्थित होते.
फोटो
पन्हाळा : ‘परिक्रमा २०२२’ या टेक्निकल ईव्हेंटचे पोस्टर प्रेझेंट करताना पी. आर. भोसले, सोबत एन. आर. भोसले, प्राचार्य डॉ. मोहन वनरोट्टी व मान्यवर.