
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-अक्षयतृतीया या पावन मुहूर्तावर जगद्गुरु संत श्री बसवेश्वर महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम मृगेंद्र मठ,अंबागेट येथे मोठ्या थाटात पार पडला.यावेळी जगतज्योती बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण माजी खा.अनंतराव गुढे हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष माजी खासदार अनंतराव गुढे प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे अमरावती जिल्हा संघटक सचिन वाटकर यांनी महाराजांच्या जीवन व समाज कार्याविषयी माहिती दिली.लिंगायत समाजाचे धर्मगुरू व थोर समाजसुधारक बसवअण्णा महाराज यांचा जन्म कर्नाटक मद्धे वीरशैव कुटुंबात सन ११०५ साली झाला असून त्यांनी हिंदू धर्मातील जातीव्यवस्थेविरुद्ध व अन्य हानिकारक प्रथांविरुद्ध संघर्ष केला.त्यांनी कुडलसंगम येथे मोठे अध्ययन केंद्री वेगवेगळ्या भाषा,धर्म ,तत्वज्ञान इत्यादींचा अभ्यास केला.त्यांच्यासारखे तत्वज्ञानी समाजसुधारक आज जर असते तर सद्यस्थितीत नक्कीच देशात होणारी विषमता,हिंसा,भेदभाव व जातीय राजकारण इ.समस्यांवर पायबंद आळा घातला असता असे माजी खा.अनंतराव गुढे यांच्या अध्यक्षतेखाली सचिन वाटकर यांनी यावेळी म्हटले.तसेच समाजाविषयी आपले काय देणे आहे,कसे समाजाला पुढे नेता येईल याविषयी उपस्थित नागरिकांसमोर आपले विचार मांडले.
यावेळी कार्यक्रमाचे संचालन नानाभाऊ सावरकर तसेच आभार प्रदर्शन सचिन वाटकर यांनी केले.कार्यक्रमाला विशेष उपस्थितीमध्ये नरेन्द्र रावळे,अरूणभाऊ चव्हाण,नानाभाऊ सावरकर,श्री मोहन पिढेकर,श्री अरुण विजयकर,रामाजी उज्जैनकर,हनुमंत सावरकर,राहुल वाटकर,रविंद्र उजैनकर,अनीलभाऊ सावरकर,संतोष पिढेकर,राजेश सावरकर,शैलेश जिरापुरे,अजिंक्य सावरकर,सतीश कोल्हे,सागर वाटकर,विनोद कोठेकर तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमावेळी उपस्थित होते.