
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज -बाजीराव गायकवाड
पेठवडज :– पेठवडज सर्कल मधील दोन्ही तालुक्याना जोडणारी आणि संपूर्ण पेठवडज सर्कल मधील गरीबांना, विद्यार्थ्यांना, दिव्यांगाना, नागरिकांना, सोयीची लालपरी मुखेड आगारातून सुरू करण्यात आली आहे. कंधार- फुलवळ- आंबुलगा-सावरगाव-देवईचीवाडी-पेठवडज-सिरसि(खुर्द) -गोणार-मुखेड ही बस कंधारहुन निघण्याची वेळ सकाळी ९ वाजता, दुपारी १:१५ वाजता, संध्याकाळी ६:३० वाजता आणि मुखेडहुन निघण्याची वेळ सकाळी ५:४५ वाजता, सकाळी १०:३०वाजता, दुपारी ३ वाजता निघणार आहे. तरी पेठवडज सर्कल मधील सर्व प्रकारच्या प्रवाशांनी या गाडीने प्रवास करून लालपरीला सहकार्य करावे असे मुखेड आगारप्रमुखानी कळविले आहे.