
दैनिक चालू वार्ता मुखेड प्रतिनिधी-संघरक्षित गायकवाड
मुखेड तालुक्यातील येवती येथील श्री श्री प. पु. सद्गुरु श्री नराशाम महाराज मठ संस्थान येवती ( लघु आळंदी) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व भक्तांसाठी सेवा समिती मार्फत यावर्षी श्रीक्षेत्र काशी येथे शिवपुराण या महान ग्रंथाच्या सत्संग कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
प. पु. श्री सद्गुरु नराशाम महाराजांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र येवती येथे प्रतीवर्षी नवनवीन धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. भागवत महाकथा सप्ताह आयोजन, श्रावणमास अन्नदान उपक्रम दरवर्षात दोन श्रावण आणि पौष महिन्यातील सप्ताह, महाआरती आणि मोठ्याप्रमाणात भंडाऱ्याचे आयोजन, सामूहिक गुरुमंत्राचा दीक्षा कार्यक्रम, इतर अशा प्रकारच्या अनेक धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. पूर्ण नटलेल्या पुण्य पावन अशा धार्मिक क्षेत्र श्री काशी (वाराणसी) येथे श्री विश्वेश्वरा चरणी पावन श्रावण मासात प. पु. श्री
सद्गुरु नराशाम महाराज यांच्या सहवासात व मार्गदर्शना खाली महान ग्रंथ शिवपुराण या कथेचे महात्म्य श्रवण करण्याचा अमृतमय योग जुळून आला आहे. म्हणजेच श्रावण मासातील यात्रा ही दिनांक २० ऑगस्ट २०२२ रोजी नांदेड येथुन प्रस्थान करणार आहे. व ३० ऑगस्ट २०२२ रोजी नांदेड येथे यात्रेचे आगमन होईल. तरी या अमृतमय योगाचा ज्या भाविकांना लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी आधी सेवा समितीकडे नोंदणी शुल्क देऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. सर्व भक्तांनी या आयोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन नराशाम महाराज मठ संस्थान वतीने करण्यात आले आहे. इच्छुकांनी नोंदणीसाठी बाळू महाराज मठ संस्थान येवती, व्यंकट सावकार पद्मावार, नांदेड, राजु पाटील मोकासदरा, दत्तात्र्य पाटील टाकळीकर, पांडूरंग पाटील टाकळीकर, नांदेड, संतोष महेंद्रकर, मुखेड यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.