
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-अंजनगाव सुर्जी शहरातील गणगनेपुरा येथे राहणारे विपुल पांडुरंगजी गणगने यांच्या मालकीचे माऊली जल (RO) दुकानाला गुरुवारी सकाळी १ वाजताच्या सुमारास शॉक सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळाली असता आगीमद्धे रिकाम्या असलेल्या एकशे पंन्नास कॅन,वायरिंग व इलेक्ट्रिक उपकरणे जळून खाक झाली.रोडवर मालकी हक्काची जागा असल्याकारणाने घर आणि दुकान एकत्रित आहे.मात्र शॉक सर्किटमुळे झालेल्या आगीमद्धे सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नाही.
उन्हाळा असल्याने थंड पाण्याची(RO)कॅन मागणी भरपूर प्रमाणात असते.माहितिप्राप्तीनुसार,गणगणे ह्यांनी घटनेची माहिती तात्काळ अंजनगाव सुर्जी अग्निशमन दलाला दिली.अग्निशमन दलाचे जवानांनी सतर्कता दाखवत घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाचे लेडिंग फायरमन अरुण माकोडे,वाहनचालक आशिष कोळखरे व फायरमन गौरव इंगळे यांनी अतोनात प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविल्याने खुप मोठा अनर्थ टळला.
सुदैवाने आगीमध्ये कुठलीही जिवीत हानी झाली नसून आग विपुल गणगणे ह्यांनी विद्युत वितरण कंपनीला सदर घटनेची माहिती दिली.