
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुक्रमाबाद – येथुन जवळच आसलेल्या मष्णेर( मदनेश्वर )येथे भाविक भक्ता साठी सोई सुविधा उपलब्ध नाहीत सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत पाणी टंचाई आहे निवासाची सुविधा नाही मष्णेर हे देवस्थान आठरा पगड जातीचे कुलदैवत आहे तसेच हे देवस्थान तिन राज्याच्या सिमेवर आहे महाराष्ट्र – कर्नाटक – तेंलगना स्टेट आशा ह्या तिंन्ही राज्यातुन दर मंगळवारी लाखो भाविक भक्त येथे दर्शनाला येतात नवविवाहित वधु -वर हे मष्णेर देवस्थानच्या दर्शना पासुनच आपल्या भावी जिवनाची वाटचाल करतात सावळी ते मष्णेर देवस्थान हा रस्ता सिंगल आहे दोन गाड्या पास होऊ शकत नाहीत मोटार सायकलवाल्यांची खुप मोठी गर्दी आसते मंदिर परिसरात गाडी पार्किंग रोडवरच करतात या साठी मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्ताची गरज आहे महिला सोबत लहान बालकांची हाल होतात दर्शनाचे नियोजन नाही पुजारी – मानकरी भाविक भक्ताना निट भाषा बोलत नाहीत भाविक भक्त मोठ्या श्रध्देने मोठमोठे हार देवासाठी आनतात पण तेच हार पुजारी हातत घेऊन मंदिराच्या दिशेने फेकुन देतात तरी येथील लोकप्रतिनिधीनी जरा मष्णेर देवस्थान कडे लक्ष दिले तर मंदिर परिसराचे पावित्र्य राखले जाऊ शकते सध्या उन्हाळ्याचे दिवसआसल्या मुळे जिव पाणी पाणी करतो लहान बालकाची पाण्यासाठी खुप बे हाल होतात दर मंगळवारी येथे कमीत कमी 200 (कंदुरी मष्णेर सन ) होतात लाईट ची व्यवस्था नाही भक्त मंडळी साठी निवारा नाही सध्या येथे एकच मोठा हॉल आहे अंदाजीत लांबी 40× 50 आसा आहे तालुका प्राशासनाने दर मंगळवारी पोलीस बंदोबस्त दिला तर भाविक भक्ताना दर्शन मिळु शकते तरी मा आमदार साहेबांनी जरा मष्णेर देवस्थाना कडे लक्ष देऊन भाविक भक्तांची होनारी हेंळसांड थांबवावी व आपल्या स्तरावर मंदिर परिसरत विकास कामे करावीत आसी मागणी पोलीसवाडी ता लोहा येथील लोकनियुक्त सरपंच पिराजी धुळगंडे यांनी केली आहे