दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका
केज (प्रतिनिधी):- केज शहराच्या शैक्षणिक परंपरेला बळकटी देण्याचा प्रयत्न नेहमीच शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या जीवन शिक्षण परिवाराने केला आहे. केज शहराचा शैक्षणिक आलेख वाढून तो राज्यस्तरापर्यंत पोहोंचला पाहिजे यासाठी जीवन शिक्षण परिवार नेहमीच प्रयत्नशील आहे. या शैक्षणिक समुहात एल. के. जी. ते उच्च शिक्षणापर्यंत ची सोय करून दिली आहे. त्यासोबतच आगामी काळात केज शहर व परिसरातील भावी डॉक्टर व इंजिनिअर होवू इच्छिणार्या विद्यार्थ्यांसाठी नवनवीन सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. कोटा (राजस्थान) येथील शिक्षण क्षेत्रात नामवंत व देशभरात आग्रगण्य असलेल्या बन्सल क्लासेसची शाखा केज शहरात सुरू होत आहे. ही शाखा जीवन शिक्षण समुहाला सुरू करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे येणार्या काळात केज व परिसरातील असंख्य डॉक्टर आणि इंजिनिअर दिसणार आहेत. बन्सल क्लासेस मध्ये देशभरातील नामवंत प्राध्यापक व तज्ञ मार्गदर्शक मंडळी असणार आहे. मंगळवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शुभारंभ व शैक्षणिक मार्गदर्शन सोहळा संपन्न होत आहे. या प्रसंगी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मा. ना. धनंजय मुंडे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. तरी या कार्यक्रमास परिसरातील विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जीवन शिक्षण समुहाचे सचिव मा. हरुणभाई इनामदार यांनी केले आहे.
Related Stories
12 hours ago
12 hours ago
12 hours ago