
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
फुळवळ येथे कंधार पं. स चे माजी सदस्य तथा खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन कै. निळकंठराव माधवराव मंगनाळे यांच्या ३ ऱ्या पुण्य स्मरणार्थ निमित्त ष.ब्र. प्र.श्री १०८ सोमलिंग शिवाचार्य महाराज बिचकुंदेकर,व हभप महंत श्री एकनाथ नामदेव महाराज उमरजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हभप मुडेकर महाराज गंगाखेडकर यांचा भव्य किर्तनाच्या कार्यक्रम समाधी स्थळ फुळवळ येथे दि.२४-४-२०२२ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत संपन्न झाला आहे. त्यानंतर महाप्रसादच्या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते यावेळी किर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी घेतला.
यावेळी कार्यक्रमाला माजी आमदार ईश्वरराव भोसीकर, माजी आमदार रोहिदास चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोसीकर,सौ. वर्षाताई भोसीकर, जिल्हा नियोजन समितीचे सचिव अनिल उर्फ एकनाथ मोरे , माजी पं.स. सभापती बालाजी पांडागळे, ग्रामीण तंत्रनिकेतन चे संजय पवार, शाहू नळगे, मनोहर भोसीकर, उपनगराध्यक्ष दत्ता वाले, नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण,शिक्षक नेते हरीभाऊ चव्हाण, दिनेश तेललवार, साहित्यिक शेषराव कहाळेकर, उद्योजक बनसोडे,सादलापुरे,राजू शेटे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव गिरे यांच्या सह मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
रामराव नारायणराव मंगनाळे, विठ्ठल नारायण मंगनाळे, मल्लिकार्जुन नारायण मंगनाळे, सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी विश्वाभंर निळकंठराव मंगनाळे, बसवेश्वर निळकंठराव मंगनाळे, बापुराव निळकंठराव मंगनाळे यांनी परिश्रम घेतले