
दैनिक चालु वार्ता सिल्लोड प्रतिनिधी- सुशिल वडोदे
सिल्लोड: तालुक्यातील सारोळा येथे सरपंच डॉ. लक्ष्मीकांत दांडगे आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने एकत्रित येऊन शासन स्तरावरून अधिकृत मान्यता घेऊन गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला. यावेळी सरपंच व इतर प्रतिष्ठित नागरिक एकत्रित येऊन त्यांनी सदरील कल्पना गावकऱ्यांसमोर मांडली. पूर्णपणे राजकारण बाजूला ठेवून हा पुतळा उभारण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विनापरवाना, अनधिकृत पुतळे उभारून बऱ्याचवेळा वाद निर्माण होतात. त्यामुळे सारोळा गावातील नागरिकांनी एकत्रित येऊन शासनाची परवानगी घेऊनच गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारायचा, असा निश्चय केला. नुकतीच प्रशासनाची मान्यता घेऊन सारोळा गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारला. यासाठी सरपंच लक्ष्मीकांत दांडगे यांच्यासह उपसरपंच श्रीरंग वाघ, बबन काकडे, सुभाष काकडे, मनोज जैस्वाल, गजानन काकडे, रामचंद्र गोरे, भारत गायकवाड, उखडू साळवे, ज्ञानेश्वर वराडे, प्रकाश जैस्वाल, युवराज वराडे, तंटामुक्ती अध्यक्ष कैलास वराडे, पोलिस पाटील सुधाकर काकडे, सोसायटी चेअरमन रमेश काकडे, विनोद गायकवाड, पत्रकार प्रकाश वराडे, गणेश काकडे, यांच्यासह मारुती वराडे, अशोक वराडे, दादा गोरे, राजू वराडे, ज्ञानेश्वर गरुड यांनी या कार्यात मोलाचे सहकार्य केले. उभारल्यानंतर ग्रामस्थांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.