प्रतिनिधी / स्वाती हडकर
चिपळूण तालुक्यातील वहाळ जिल्हा परिषद गटातून शिवसेना महायुतीच्या सौ. शिवानी संदीप सावंत यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होताच परिसरात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
या विजयी जल्लोषात सौ. शिवानी सावंत यांचे पती संदीप सावंत यांच्यासह माजी आमदार सदानंद चव्हाण, नगरपालिकेचे नगराध्यक्ष उमेश सपकाळ तसेच शिवसेना महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विजयामुळे वहाळ गटात उत्साहाचे वातावरण असून शिवसेना महायुतीचा प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
