आला दिवस भाग्याचा
राम जन्माचा जाहला
चैत्र मासात नयनी
वसंतात बहरला
आनंदीत सारी प्रजा
वाजे सनई चौघडा
रांगोळ्यांनी सुशोभित
पहा चैतन्याचा सडा
सूर्यवंशी रघुवंशी
अयोध्येचा वासी राम
प्रजादक्ष आज्ञाधारी
दर्शनात मुक्तीधाम
एकनिष्ठ आयुष्यात
सदा एकवचनाचे
असे मर्यादा पुरुष
नाम घ्यावे श्री रामाचे
धर्म संस्थापक राम
मनी करूणा सागर
अर्धमाचे संहारक
दिव्य कृपा भक्तांवर
दोन अक्षरी शब्दांत
थोर प्रचिती तयाची
सप्त अवतार आहे
अशी थोरवी रामाची
सौ.सारिका जिंतूरकर जैन
